मुंबई

Adani Electricity : अदानीच्या वीज ग्राहकांना दरवाढीचा शॉक; मे पासून प्रतियुनिट विजेचा दर वाढणार

सकाळ वृत्तसेवा

Adani Electricity Price Hike : अदानी इलेक्ट्रिसिटीने जुलै- डिसेंबर २०२३ या कालावधीत केलेल्या वीज खरेदीवर झालेला अतिरिक्त खर्च इंधन समायोजन आकाराच्या माध्यमातून वसूल करण्यास वीज नियामक आयोगाने मंजुरी दिली आहे.

त्यामुळे उपनगरातील वीज ग्राहकांच्या प्रतियुनिट विजेच्या दरात ७० पैशांपासून १.७० रुपयांपर्यंत वाढ होणार आहे. सदरची वाढ १ मे ते ऑगस्ट अखेरपर्यंत लागू असणार आहे.

वीज निर्मिती करताना वापरल्या जाणाऱ्या इंधनाच्या दरात वाढ झाल्यास त्याची वसुली इंधन समायोजन आकाराच्या (एफएसी) माध्यमातून वसूल केली जाते. जुलै ते डिसेंबर या कालावधीत इंधनावर झालेला सुमारे ३०० कोटी रुपयांचा खर्च वसूल करण्यास मंजुरी देण्यासाठी अदानी इलेक्ट्रिसिटीने आयोगाकडे याचिका दाखल केली होती.

त्याला आयोगाने मंजुरी दिली असून, त्याचा फटका घरगुती वीज ग्राहकांना मोठा बसणार आहे. ज्या ग्राहकांचा वीज वापर ०-१०० युनिट आहे त्यांच्या प्रतियुनिट वीज दरात ७० पैशांची वाढ होईल, तर १०१-३०० युनिट वापर असलेल्या ग्राहकांच्या वीज दरात १.१० रुपये, ३०१-५०० साठी १.५० रुपये तर त्यापेक्षा जास्त वापर असलेल्या ग्राहकांच्या प्रतियुनिट वीज दरात १.७० रुपये एवढी वाढ होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT