मुंबई

आदित्य ठाकरेंची वर्सोवा बीचवर 'क्लीन अप' मोहीम

सकाळ वृत्तसेवा

मुंबई -  पर्यावरणाचा मुद्दा घेऊन राजकारणात उतरू पाहणाऱ्या युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज वर्सोवा बीचवर साफसफाई मोहीम राबवली. यावेळी आदित्य यांच्यासोबत युवा सेनेचे 500 कार्यकर्ते सहभागी झाले होते. यादरम्यान आदित्य यांनी  स्वता:  तीन तास राबून वर्सोवा बिचवरील कचरा साफ केला.

गेल्या आठ महिन्यापासून आदित्य ठाकरे हे पर्यावरण विषयावर काम करत आहेत. या दरम्यान त्यांनी अनेकदा मुंबईतील समुद्र किनारे स्वच्छ करण्याच्या मोहिमेत सहभाग घेतला होता .गेल्याच आठवड्यात आदित्य यांनी वर्सोवा बीचवर साफसफाई केल्या नंतर आज पुन्हा एकदा अफरोज शाह यांच्यासोबत स्वच्छता मोहिमेत सहभागी घेऊन बीचवरील प्लास्टिक, थर्माकोल, ग्लास,पॉलिथिनच्या पिशव्या,प्लास्टिकचे ग्लास आणि इतर कचरा साफ केला. 

आदित्य ठाकरे गेल्या वर्षभरापासून पर्यावरण आणि समुद्र किनाऱ्यांची स्वछता या विषयावर काम करत आहेत. त्यांच्याच आग्रहामुळे राज्यात प्लास्टिक बंदी सारखा महत्वाचा कायदा करण्यात आला. या कायद्यानंतर आता आदित्य यांनी समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला आहे. आपण पर्यावरणाची काळजी घेतली तर पर्यावरण आपली काळजी घेईल. राज्यातील तरुणांनी स्वछता मोहिमेत सहभागी घ्यावा, यामुळे आपला शारीरिक व्यायाम होऊन आरोग्य उत्तर राहण्यास मदत होईल असे आवाहन ही आदित्य यांनी यावेळी केल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs NZ: जो रुट सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमाच्या आणखी जवळ पोहचला! कसोटीत 'असा' पराक्रम करणारा जगातील दुसराच ठरला

T20 World Cup 2026: ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या विजयानं टीम इंडियाला मोठा धक्का! सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी चूरस वाढली

FDC drugs ban: मोठा निर्णय! केंद्राकडून १६ प्रकारच्या‘एफडीसी’ औषधांवर बंदी; 'या' मेडिसिन्सचा समावेश

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

Rohit Sharma चं टेन्शन वाढणार... कर्णधार शुभमन गिलने अफगणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दिलाय इशारा

SCROLL FOR NEXT