aditya thackeray Google
मुंबई

आदित्य ठाकरेंच्या केंद्राकडे तीन मागण्या, म्हणाले...

मुंबईमध्ये लस घेण्यास पात्र असणाऱ्या सर्वच्या सर्व म्हणजेच 100 टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : दक्षिण अफ्रिकेत (South Africa) आढळलेला कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनने (Omicron Corona New Variant) आता सगळीकडे पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. देशात ओमक्रॉनने बाधित होणाऱ्या रूग्णांची संख्या 23 वर पोहोचली आहे. तर राज्यात ही संख्या 10 आहे. दरम्यान, सोमवारी मुंबईत ओमिक्रॉनचे (Omicron In Mumbai) दोन रूग्ण आढळून आल्यानंतर राज्याचे पर्यटनमंत्री आणि मुंबईचे पालमंत्री आदित्य ठाकरे (Aditya thackeray) यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandwia) यांना पत्र पाठवित तीन मागण्या केल्या आहेत.

बूस्टर डोस आणि वयोमर्यादा कमी करण्याची मागणी

आदित्या ठाकरे यांनी मंडविया यांना पाठविलेल्या पत्रात कोरोना लसीचे दोन डोस (Corona Vaccination Booster Dose) घेतलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस देण्याची परवानगी देण्याबरोबरच कोरोना लस घेण्याची किमान वयोमर्यादा 18 वरून 15 वर्षे करण्याची मागणी केली आहे. “मी वेगवेगळ्या डॉक्टरांसोबत केलेल्या चर्चेनंतर असे वाटते की, करोना लसीकरणाची किमान वयोमर्यादा ही 15 वर्षांपर्यंत करता येईल. असे केल्यास उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्येही करोना संरक्षण कवच पुरवता येऊ शकते,” असे मत आदित्या ठाकरे यांनी पत्रात व्यक्त केले आहे.

दोन डोसमधील अंतर कमी करण्याची मागणी

मुंबईमध्ये लस घेण्यास पात्र असणाऱ्या सर्वच्या सर्व म्हणजेच 100 टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तर 73 टक्के पात्र लोकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत, अशी माहितीही आदित्य यांनी पत्रात दिली आहे. त्यामुळेच दोन लसींच्या डोसमधील कालावधी चार आठवड्यांचा केल्यास, परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे लसीकरण केले जाते तसे जानेवारी 2022 च्या मध्यापर्यंत मुंबईतील सर्व पात्र नागरिकांना दोन्ही डोस देण्याचे उद्दीष्ट पूर्ण करता येईल. यामुळे अधिक लसी लागणार नाहीत किंवा कालावधीमध्येही फार फेरफार करावा लागणार नाही, अशी आशा अदित्य यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, करोनापासून आपल्या देशाला आणि देशातील नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी वरील मागण्यांसंदर्भात तुमच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी आम्हाला अपेक्षा असल्याचेही आदित्य यांनी पत्राच्या शेवटी म्हटले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajendra Singh: ध्येयवेड्यांनीच क्रांती केल्याचा इतिहास: जलपुरुष राजेंद्र सिंह; बंदुकीच्या जागी हातात कुदळ, फावडी

Latest Marathi News Live Update : सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, बाळा नांदगावकर यांची मागणी

कतरिना कैफच्या प्रेग्नेंसीमध्ये घरात चिंतेचं वातावरण, दिराने सांगितलं कुटुबात नक्की चाललंय काय?

Mumbai News: एशियाटिक टाऊन हॉलची दुरवस्था! इतिहास जपायचा की निवडणुका जिंकायच्या? दुहेरी आव्हान उभं

Beed News: गरोदर महिलेच्या जिवाशी खेळ कशासाठी? लेबर रूमसमोरच महिलेची प्रसूती, बीड जिल्हा रुग्णालयातील प्रकार

SCROLL FOR NEXT