Aditya Thackeray esakal
मुंबई

Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंचे मुंबई महानगरपालिकेवर आरोप ; म्हणले पालिका... !

सकाळ डिजिटल टीम

Aditya Thackraey : मुंबईत कचऱ्याचे ढीग महिनोंमहिने पडून आहेत. मुंबईकर या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी तक्रार करत आहेत. मात्र, पालिकेच्या वॉर्डात कचऱ्याच्या समस्येचे निवारण होत नाही. मुंबई महापालिका फक्त बिल्डर लॉबी आणि कंत्राटदारांसाठी काम करते, असा आरोप शिवसेनेचे (ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंग चहल यांना दिलेल्या पत्रात केला आहे.

७ मार्च २०२२ पासून मुंबई महापालिकेत लोकप्रतिनिधी नाहीत. विशेष म्हणजे १५ वॉर्डांत सहाय्यक आयुक्तांची पदे रिक्त आहेत. मुंबईकरांना एखाद्या प्रश्नी तक्रार करायची तर कुठे करायची, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रातून केला आहे.

मुंबई शहरामध्ये गेल्या ३ महिन्यांपासून अनेक नागरिकांनी संपूर्ण शहरात कचऱ्याचे ढीग वाढत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. मुंबई महापालिका संपूर्ण मुंबईमध्ये कुठल्याच विभागामध्ये कचरा गोळा करण्याचे काम नियमितपणे करताना दिसत नाही. शहरातील सर्वच वॉर्डांतील कचरा वेळेवर उचलला जात नसल्याचे खरे कारण काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT