Aditya Thackeray bmc  sakal
मुंबई

Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी केलेले आरोप निराधार; BMCचे स्पष्टीकरण !

सकाळ डिजिटल टीम

Aditya Thackeray: महानगरपालिका प्रशासनामार्फत रस्ते सुधारणांसाठी रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रीटीकरण प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या रस्ते कामांबाबत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी गंभीर आरोप केले आहेत. हे सर्व आरोप निराधार आणि वस्तुस्थितीशी विसंगत असून त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही; असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

महापालिकेद्वारा ३९७ किलोमीटर अंतराच्या एकूण ९१० रस्त्यांचे काँक्रीटीकरणाकरिता जानेवारी २०२३ मध्ये कंत्राटदारांना कार्यादेश देण्यात आले असून सदर कामे पाच मोठ्या कंत्राटदारांमार्फत प्रगतिपथावर आहेत.

येथे सुरू आहेत कामे

१ पश्चिम उपनगरात एकूण ९६ ठिकाणी कामे सुरू आहेत. त्यातील ८३ ठिकाणी पर्जन्य जलवाहिनीची कामे प्रगतिपथावर आहेत व १३ ठिकाणी वाहतूक मार्गाकरिता खोदकाम प्रगतिपथावर आहे. लवकरात लवकर काँक्रीटीकरण करण्यात येईल.

२ पूर्व उपनगरात एकूण २७ ठिकाणी कामे सुरू आहेत. त्यातील १९ ठिकाणी पर्जन्य जलवाहिनीची कामे प्रगतिपथावर आहेत. ८ ठिकाणी वाहतूक मार्गाकरीता खोदकाम प्रगतिपथावर असून लवकरात लवकर काँक्रीटीकरण करण्यात येईल.

३ शहर विभागातील कामे रखडली असून तेथील कंत्राटदाराला नोटीस बजावण्यात आली असून कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. तिथेही लवकरच काम सुरू करण्यात येईल.

काय आहे प्रशासनाचे म्‍हणणे?

मुंबईकरांच्या दर्जेदार रस्ते निर्मितीसाठी पालिकेने सातत्याने या प्रकल्पासाठीचा पाठपुरावा केला आहे. या कॉंक्रीट रस्त्यांमुळे मुंबईतील नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यंदा पावसाळ्यातदेखील प्रकल्प रस्त्यांवरील खड्डे बुजवून नागरिकांना वाहतुकीचा त्रास होणार नाही, या दृष्टीने खबरदारी घेत देखभालही केली आहे. त्यामुळे सिमेंट कॉंक्रीट रस्त्यांच्या निमित्ताने करण्यात आलेले आरोप हे वस्तुस्थितीला अनुसरून नाही, असा खुलासा पालिका प्रशासनाने केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT