मुंबई

कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी जीवक रोबोट दाखल; डॉक्टरांचाही धोका होणार कमी

प्रशांत कांबळे



मुंबई ः  मध्य रेल्वे मार्गावरील परळ कार्यशाळेत तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक रोबोट 'जीवक' भायखळा येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरीयल हाॅस्पिटलमध्ये दाखल झाला आहे. रुग्णांना तपासण्यास जीवकची डाॅक्टरांना मदत होणार आहे. त्यामुळे डाॅक्टरांचाही धोका कमी होणार आहे.  मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी नुकतेच त्याचे उद्घाटन केले आहे. 

कोव्हिड योद्ध्यांच्या सुरक्षिततेसाठी मध्य रेल्वेच्या परळ कार्यशाळेने पुढाकार घेतला असून आतापर्यंत त्यांच्यासाठी  मुखपट्ट्या, पीपीई कव्हरेल्स, सॅनिटायझर, ऑक्सिजन ट्रॉलीची निर्मिती केली आहे. तसेच रेल्वे डब्ब्यांना कोव्हिड विलगीकरण डब्ब्यांमध्ये रूपांतरित केले आहे. त्याचअंतर्गत ड्रोनस्टार्क आणि बीजीएन मेडटेक्स (इंडिया)यांच्या सहकार्याने परळ कार्यशाळेने 'जीवक' या मेडी-बोटची संकल्पना आखून रोबोटचीसुद्धा निर्मिती केली आहे. 

जीवकची विशेषता
जीवकच्या माध्यमातून डॉक्टर आपल्या केबिनमधूनच रूग्णाशी बोलू शकतो आणि पडद्यावर रुग्ण पाहून व्हर्च्युअल तपासणी करु शकतो. त्यासाठी जीवक रुग्णाचे तपमान, रक्तदाब, हृदय गती आणि ऑक्सिजन पातळीची तपासणीही करू शकणार आहे. तसेच, जीवककडे औषधाची पेटीदेखील असणार आहे. त्यातून रुग्णाला नियमित औषधे देता येतील.

-------------------------------------------------------------- 

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : देशातील पहिल्या पर्यटन पाणबुडीच्या बांधणीला सुरुवात; २०२७ मध्ये प्रकल्प पूर्ण होणार

Nagpur Raid: नागपूरमध्ये कामोत्तेजना वाढवणारं बोगस औषध उजेडात! 'या' कॅप्सुलचा पर्दाफाश; अन्न व औषध प्रशासनाची रेड

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सीसीटीव्ही, डीएनए पुराव्यांवरून आरोपीचा खोटेपणा उघड; २५ जूनला निकाल

Strait of Hormuz Closed: पुन्हा मध्यपूर्वेत युद्धाची चिन्हे? होर्मुझ सामुद्रधुनी बंद; इराणचा मोठा निर्णय, दिला मोठा इशारा

IND vs AFG: यशस्वी जैस्वालचे खणखणीत शतक अन् मग विजयी षटकार... भारताचा अफगाणिस्तानला व्हाईटवॉश

SCROLL FOR NEXT