Corruption case Sakal
मुंबई

पालघरमधील शिक्षणाधिकाऱ्यांच्या अटकेनंतर मुंबईतील शिक्षणाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले

मेस्टानी केली सर्व शिक्षणाधिकाऱ्यांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - पालघर जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी लता सानप यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल रंगेहाथ पकडल्याने मुंबईतील शिक्षण अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.पालघर आणि ठाणे विभागाच्या कामकाजाचा थेट संबंध हा मुंबई आणि पुढे मंत्रालयापर्यंत येत असल्याने अनेक अधिकारी या अटकेमुळे धास्तावले असल्याचे सांगण्यात येते. केवळ 25 हजाराच्या लाचेसाठी एका शिक्षणाधिकाऱ्याला अटक होणे ही बाब अत्यंत गंभीर असल्याने ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये मागील काही वर्षातपर्यंत कार्यरत असलेल्या सर्व शिक्षणाधिकाऱ्यांची संपत्ती आणि त्यांनी केलेल्या कामकाजाची नव्याने चौकशी करावी अशी मागणी महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीस असोसिएशन (मेस्टा)ने केली आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र लिहले आहे.

ठाणे, पालघर या जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात शिक्षणाधिकाऱ्यांकडून शिक्षक, शाळा आणि खाजगी संस्थांच्या कामकाजासंदर्भात बेकायदेशीरपणे पैसे वसूल केले जातात. यासाठी ठाणे जिल्ह्यातील संस्थाचालकांनी असंख्य तक्रारी करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने याविषयी आता आपल्याला ईडी आणि आर्थिक गुन्हे शाखेकडे या शिक्षण अधिकाऱ्यांची तक्रार घेऊन जावे लागेल, असा इशारा मेस्टाचे संस्थापक अध्यक्ष संजयराव तायडे-पाटील यांनी दिला आहे. ठाणे, पालघर जिल्ह्यात सोबतच मुंबईही असेच प्रकार सर्रासपणे सुरू असून अनेक कामकाजाचे दर ठरलेले आहेत. शिवाय हे कामकाज हाताळण्यासाठी मुंबईत काही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तर काही ठिकाणी शिपाई, वाहनचालकमार्फत हे काम केले जात असून याविषयी शिक्षक आमदार नागो गाणार यांनीही चौकशी करण्याची मागणी केली होती. चेंबूरमध्ये एका शिपायापासून शिक्षक झालेल्या आणि शिक्षणाधिकाऱ्यांच्या कामकाजात हस्तक्षेप करणाऱ्या त्या व्यक्तीचीही चौकशी करण्याची मागणी गाणार यांनी केली होती. मात्र त्यावरही आत्तापर्यंत काहीच न झाल्याने ठाणे, पालघर आणि मुंबईतील सर्वच शिक्षणाधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करावी अशी मागणी मेस्टाने केली आहे. शालेय शिक्षण विभाग याविषयी गंभीर होणार नसेल तर आम्हाला पुढचा मार्ग अवलंबावा लागेल असा गंभीर इशारा त्यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT