मुंबई

तुम्ही बरे झालात, घरी जाऊ शकता! परंतु घरी पोहचल्यावर आला तो फोन...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : वयाची सत्तरी नजिक असलेल्या महिलेस कोरोनाचे उपचार झाले असल्याचे सांगून घरी पाठवण्यात आले, पण काही तासातच त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून परत विलगीकरणात जाण्याची सूचना देण्यात आली. 

या महिलेचा चौथा चाचणी अहवाल निगेटीव आला होता. त्यामुळे त्यांना मंगळवारी घरी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र घरी परतल्यावर काही वेळातच डॉक्टरांना तिसऱ्या चाचणीचा अहवाल मिळाला. तो पॉझिटीव होता. त्यामुळे या महिलेस बोरीवलीत बुधवारी विलगीकरण कक्षात दाखल होण्याची सूचना करण्यात आली, पण त्यानंतर यात कोणताही निष्काळजीपणा घडला नसल्याचे वैद्यकीय आधिकाऱ्यांनी सांगितले. 
या प्रकारात कोणताही निष्काळजीपणा नाही. चौथ्या चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आल्यामुळेच त्यांना घरी पाठवले होते. तिसऱ्या चाचणीचा अहवाल काहीसा उशिरा आला. रुग्णात कोणतीही कोरोनाची लक्षणे नाहीत, केवळ खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवले आहे, असे वैद्यकीय आधिकाऱ्यांनी सांगितले. 

तिसरा चाचणी अहवाल येण्यापूर्वी त्यांना घरी पाठवण्याची घाई का करण्यात आली. तिसऱ्या चाचणीचा अहवाल आला नव्हता, तर चौथ्या चाचणीची घाई का करण्यात आली असे प्रश्न विचारले जात आहे. या महिलेला दोन आठवड्यापूर्वी झालेल्या चाचणीत पॉझिटीव ठरली होती. त्यानंतर त्यांची सोसायटी कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आली. 
आता दोन आठवड्यांनी तीनपैकी दोन विंग्जचे दरवाजे मंगळवारी खुले करण्यात आले होते. मात्र लगेच बुधवारी पुन्हा बंद करण्यात आले. अजून चौदा दिवस कंटेनमेंट असेल असे सांगण्यात आले. आमच्याकडील जीवनावश्यक वस्तूंचा साठा संपत आहे, अशी तक्रार केली. मात्र महापालिका आधिकाऱ्यांनी जीवनावश्यक कंटनेमेंट करण्यात आलेल्या सोसायटीतील जीवनावश्यक वस्तूंची गरज आम्ही पुरवत आहोत. या सोसायटीने चांगले सहकार्य केले आहे असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT