मुंबई

परीक्षा कशी व किती गुणांची घ्यायची? अभ्यासक्रम कपातीनंतर आता परीक्षांचा पेच; शाळा शिक्षण विभागाच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत...

तेजस वाघमारे



मुंबई : शालेय शिक्षण विभागाने पहिली ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात केली आहे. या निर्णयानंतर शाळा परीक्षा कशा आणि किती गुणांच्या घ्यायच्या याबाबत संभ्रमात आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने घटक चाचणीबाबत लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून होऊ लागली आहे. यामध्येच शिक्षण विभागाच्या आदेशाची वाट न पाहता काही शाळांनी ऑनलाईन घटक चाचणी घेण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे घटक चाचणीबाबत पालक, विद्यार्थी व शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने ऑनलाइन शाळा सुरू केल्या आहेत. त्यानुसार शाळा विद्यार्थांना ऑनलाईनद्वारे शिक्षण देत आहेत. शाळा उशीराने सुरू झाल्याने शिक्षक संघटनेकडून सीबीएसईप्रमाणे अभ्यासक्रम कपात करण्याची मागणी सरकारने विलंबाने मान्य केली. मात्र आता अनेक शाळांना ऑनलाईन घटक चाचणी घेण्याची तयारी सुरू केली आहे. ऑनलाईन शिक्षण अद्यापही सर्वांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे चाचणी नको असा सूर पालक व शिक्षकांमधून उमटत आहे.

शाळेत प्रथम व द्वितीय सत्रात प्रत्येकी एक घटक चाचणी घेतली जाते. ही परीक्षा लेखी असल्याने ती सध्या घेणे शक्य नाही. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घटक चाचणी परीक्षा व सत्र परीक्षा कशी व किती गुणांची घ्यायची, मूल्यांकन पद्धत कशी असेल याबाबत शिक्षण विभागाने तातडीने स्पष्टता आणावी अशी मागणी टीचर्स डेमोक्रेटिक फ्रंटचे उपाध्यक्ष राजेश पंड्या यांनी केली आहे. तसेच ऑनलाईन शिक्षण सर्वांपर्यंत पोहचत नाही. त्यामुळे ऑनलाईन चाचणी नको, अशी मागणी होत आहे. त्यामुळे याबाबतीत तातडीने निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केली आहे.

-----------------------------------------------------

Editing Tushar Sonawane

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT