मुंबई

हृदयद्रावक! आईवडिलांच्या निधनानंतर अखेर अपंग मुलीनेही मृत्यूला कवटाळले!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोनाचा 'हाय रिस्क' विभाग असलेल्या वरळीतील जिजामाता नगरात हृदय हेलावून टाकणारी घटना घडली. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर निराधार झालेल्या एका अपंग मुलीने अन्नपाणी सोडून मृत्यूला कवटाळले. 

श्रुती पवार (वय 19) ही जन्मापासूनच अपंग होती. तिचे वडील सफाई कामगार होते. वडिलांच्या मृत्यूनंतर आई जिजामाता नगरात मोलमजुरी करून कुटुंब चालवायची. गेल्या चार वर्षांपूर्वी तिच्या वडिलांचे सुधाकर यांचे निधन झाले. वडिलांच्या मृत्यूनंतर तिची आई जागेवर खिळून असलेल्या आपल्या मुलीचा सांभाळ करीत होती. गेल्या काही दिवसांपूर्वी तिची आई मृत्यू पावली. आधीच खचलेली श्रुती अधिकच खंगत गेली. आईच्या मृत्यूनंतर तिने अन्नपाणी सोडले. शेजारी असलेल्या चुलतीने तिला अन्नपाणी देण्याचा प्रयत्न केला; मात्र तिने अन्नपाणी सोडले. अखेर काल सकाळी तिने मृत्यूला कवटाळले. या घटनेने जिजामाता नगरात हळहळ व्यक्त होत आहे. 

मृत्यूनंतर श्रुतीचा मृतदेह नागरिकांनी नायर रुग्णालयात नेला. तिचा अपघाती मृत्यू असल्याच्या संशयावरून पोलिस मृतदेह ताब्यात देत नाहीत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून तो नायरच्या शवागृहात आहे.

After the death of her parents, the disabled girl also died

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेश चतुर्थीला ओव्हलच्या मैदानात झालेली हत्तीची एंट्री अन् मग भारताने मिळवलेला ऐतिहासिक विजय; जाणून घ्या खास किस्सा

आजचे राशिभविष्य - 16 सप्टेंबर 2026

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

SCROLL FOR NEXT