Milind Deora Resigns Esakal
मुंबई

Milind Deora Resigns: सिद्धीविनायकाच्या दर्शनाला जाण्याआधी मिलिंद देवरांची माध्यमांना प्रतिक्रिया म्हणाले, 'मी विकासाच्या...'

Milind Deora Resigns: मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. देवरा यांच्या पक्षपदाच्या राजीनाम्यामुळे आजच ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी जात असताना माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

काँग्रेस नेते आणि माजी खासदार मिलिंद देवरा शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. देवरा यांच्या पक्षपदाच्या राजीनाम्यामुळे आजच ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. ११ वाजता सिद्धीविनायकाचं सपत्नीक दर्शन घेऊन मिलींद देवरा आपली भूमिका माध्यमांसमोर स्पष्ट करणार आहेत. दरम्यान सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी जात असताना माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. 'मी विकासाच्या मार्गावर जात आहे', असं मिलिंद देवरा यांनी म्हटलं आहे.

मिलींद देवरा यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. त्यावर आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया येत आहेत. त्यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी हा निर्णय दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी याबाबत सोशल मिडीयावर पोस्ट लिहली आहे.

काय म्हणाल्या आहेत वर्षा गायकवाड?

मिलिंद देवरा यांनी घेतलेला हा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. काँग्रेस परिवारासोबत देवरा कुटुंबिय हे अनेक वर्षांपासून निष्ठेने जोडलेले होते. हे पाऊल टाकू नये यासाठी आम्ही सर्वांनी शर्थीने प्रयत्न केले. पक्ष नेतृत्वाने पण तुमची मनधरणी केली. पक्ष एक इतिहास रचत असताना तुम्ही पक्ष सोडण्याचे जाहीर केले, असं गायकवाड यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

कोण आहेत मिलिंद देवरा?

मिलिंद देवरा हे महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुरली देवरा यांचे पुत्र आहेत. मुरली देवरा केंद्र सरकारमध्ये मंत्री होते. मुंबई दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसने नेहमीच विजय मिळवला आहे आणि देवरा कुटुंबाचा या लोकसभा मतदारसंघाशी अनेक वर्षांपासून संबंध आहे. इतकेच नाही तर उद्योगपती अंबानी त्यांचा प्रचार करायचे अशी देवरा यांची ओळख आहे. मागील 2019 च्या निवडणुकीत देखील रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी देवरा पाठिंबा दिला होता.

मिलिंद देवरा हे कधीकाळी राहुल गांधींच्या खूप जवळचे मानले जात होते. ते राहुल गांधींच्या कोअर कमिटीत देखील आहेत, म्हणजेच ते माजी काँग्रेस अध्यक्षांच्या जवळचे असलेल्या देवरा यांनी घेतलेल्या निर्णयामुले राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात देवरा कुटुंबाची वेगळी ओळख आहे. या कुटुंबातील एखादा तरी सदस्य गेली चार दशके दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. मिलिंद देवरा येथून दोन वेळा खासदार झाले आहेत, तर त्यांचे वडील आणि माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा हेही याच मतदारसंघातून चार वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. ही जागा देवरा घराण्याची पारंपारिक जागा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Market Alert : IPO मध्ये गुंतवणूक करायची आहे? या आठवड्यात शेअर बाजारात खुले होणार 6 नवे IPO; जाणून घ्या कधी आणि कोणते?

Parli Nagar Parishad Election: परळी नगर पालिकेत राष्ट्रवादीच्या आघाडीतून MIM बाहेर; सत्तास्थापनेनंतर नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

Pune News : गणेश बिडकरांनी ओलांडला वीस लाख पावलांचा टप्पा; ६० हजार नागरिकांशी सहा महिन्यांत तीनदा थेट संपर्क

Apple Nutrition: लाल की हिरवे सफरचंद? जाणून घ्या आरोग्यासाठी कोणते फायदेशीर

SCROLL FOR NEXT