मुंबई

बहिणीच्या आत्महत्येनंतर संतापलेल्या भावाने पोलिस ठाण्यातच चिरला भाऊजीचा गळा

सकाळ वृत्तसेवा

नालासोपारा : बहिणीच्या आत्महत्येनंतर संतापलेल्या भावाने पोलिस ठाण्यातच भावजीच्या गळ्यावर चाकूने वार करून निर्घृणपणे हत्या केल्याची घटना सोमवारी (ता. 14) दुपारी 4 वाजता नालासोपारा पोलिस ठाण्यात घडली. या घटनेनंतर आरोपीला तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने परिसरात मात्र खळबळ उडाली. 


आकाश कोळेकर असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून रवींद्र शंकर काळे असे आरोपीचे नाव आहे. मयत आकाश आणि आरोपी हे दोघेही सातारा जिल्ह्यातील आहेत. आकाश आणि आरोपीची बहीण कोमल हिचा दीड वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. प्रेमविवाहानंतर हे दोघे नालासोपारा येथे राहण्यास आले होते.

घरातील किरकोळ वादातून कोमल हिने रविवारी (ता. 13) राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तिच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर आकाश याला नालासोपारा पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. नालासोपारा पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेत त्याची चौकशी सुरू असताना पोलिसांसमोरच आरोपी मेहूना रवींद्र काळे याने धारदार चाकूने आकाशच्या गळ्यावर वार करून जखमी केले.

जखमी आकाशाला बाजूच्या सिद्धिविनायक रुग्णालयात दाखल केले, पण तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. काही कळण्याच्या आतच हा सर्व प्रकार घडल्यामुळे पोलिसही हतबल झाले होते. तात्काळ पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Retirement: २०२७ चा वर्ल्ड कप हा माझा भारतासाठी शेवटचा...; विराट कोहलीचे निवृत्तीचे संकेत, रोहित शर्माही म्हणाला की...

Incognito मध्ये सर्च केल्यावर हिस्ट्री दिसत नाही; पण ‘या’ लोकांना तुमची माहिती कळू शकते

नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी! भिवंडीत १० किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा, १५ मिनिटांच्या प्रवासाला तब्बल ३ तास

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात मनसे-ठाकरे गटाचा ४ ऑक्टोबरला संयुक्त मोर्चा

१६ वर्षांपूर्वी हुप्पा हुय्या म्हणत घडवला इतिहास आता 'बजरंगी' येणार भेटीला; पोस्टरमधील अभिनेत्याला ओळखलंत का?

SCROLL FOR NEXT