Police Sakal
मुंबई

शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्यानंतर पळालेल्यांचा पोलिसांकडून शोध सुरू

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्‍हर ओक बंगल्यावर चपला, दगड फेकल्यानंतर महिला कर्मचाऱ्यांनी आक्रोश करून बांगड्याही फोडल्या.

सकाळ वृत्तसेवा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्‍हर ओक बंगल्यावर चपला, दगड फेकल्यानंतर महिला कर्मचाऱ्यांनी आक्रोश करून बांगड्याही फोडल्या.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्‍हर ओक बंगल्यावर (Bunglow) चपला, दगड फेकल्यानंतर महिला कर्मचाऱ्यांनी (Women Employee) आक्रोश करून बांगड्याही फोडल्या. या घटनेनंतर एसटी कर्मचाऱ्यांची (ST Employee) धरपकड सुरू झाली होती. मात्र, यातील भडकवणारे प्रमुख कर्मचारी पळून गेल्याने त्‍यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस (Police) विभागातील सूत्रांनी दिली आहे.

सिल्व्‍हर ओकसमोरून सुरुवातीला १०९ एसटी कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर अॅड. सदावर्ते यांना आणि आझाद मैदानातील काही प्रमुख कर्मचाऱ्यांनासुद्धा अटक केली आहे. त्याशिवाय हल्‍ल्याच्या दरम्यान पळून जाणारे, सदावर्तेचे भाषण रेकॉर्ड करणाऱ्यांची धरपकड गावदेवी पोलिसांनी सुरू केली आहे. यामध्ये एमजेटी यूट्युब चॅनलच्या मालकाची सुद्धा शोध सुरू असल्याने या प्रकरणात आरोपी वाढण्याची शक्यता आहे.

सदावर्तेंचे जुने प्रकरण उघडणार

गेल्या पाच महिन्यात अॅड. सदावर्ते यांनी महाविकास आघाडीवर ज्याप्रमाणे तोंडसुख घेतले, त्यानुसार येत्या काळात सदावर्ते यांच्यावर यापूर्वी राज्यभरात पोलिस ठाण्‍यामध्ये दाखल झालेल्या तक्रारींच्या फाईल उघडण्याची शक्यता असल्याने त्‍यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

सदावर्तेंची सनद रद्द करण्याची मागणी

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची सनद रद्द करण्याची मागणी पुण्यातील वकिलाने बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र आणि गोवाकडे केली आहे. सदावर्ते यांनी व्यावसायिक गैरवर्तन केले असून त्यासाठी त्यांच्यावर कारवाई करावी. त्यांची वकिलीची सनद निलंबित करावी, अशी मागणी वकील ॲड. सतीश मंचेकर यांनी बार कौन्सिलकडे केली आहे. वकिलाचा गणवेश न्यायालयाबाहेर परिधान करणे, कर्मचाऱ्यांबरोबर निषेध व्यक्त करणे आदी बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शिक्षक मतदारसंघातील निवडणूक अधिकाऱ्याला हटवलं, मतमोजणीच्या आधी भाजपच्या बंडखोर नेत्याने केलेली IAS विरोधात तक्रार

Sugarcane Price Protest : 'स्वाभिमानी'ने दिल्लीला जाणारा 30 टन साखरेचा ट्रक 5 मैल परिसरात पाठलाग करून अडवला; कर्नाटकातून मिरज रेल्वेस्थानकाकडे निघाला होता ट्रक

Latest Marathi News Live Update : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर आजपासून पूर्णेकर कुटुंबाचे आंदोलन

Ujani Dam: उजनीत १०३ टीएमसी पाणीसाठा; कर्नाटकची सात टीएमसीची मागणी, ३० ऑक्टोबरला निर्णयाची शक्यता

मानधन वाढवून मागितलं अन् नाटकातून काढलं! ‘आमने सामने’मधून रोहन गुजर, केतकी पालव रिप्लेस; म्हणाले…'शेवटचं गुडबायही करता आलं नाही ’

SCROLL FOR NEXT