Political News
Political News esakal
मुंबई

मलिकांनंतर पुढचा नंबर अनिल परब यांचा; सोमय्यांचा सूचक इशारा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी (Dawood Ibrahim) संबंधित मनी लाँड्रिंग (Money laundering) प्रकरणी ईडीने नवाब मलिक यांना अटक केली आहे. दरम्यान, या कारवाईनंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी एक ट्वीट करत एक सूचक इशारा दिला आहे. तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर सक्तवसुली संचलनालायने (ED) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. (Kirit Somaiya Tweet After Nawab Malik Arrest )

नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या अटकेनंतर सोमय्या यांनी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यानंतर नवाब मलिक आणि आता तिसरा नंबर अनिल परब (Anil Parab) यांचा नंबर लागणार असल्याचे ट्वीटमध्ये म्हटले असून, अनिल परब यांना आत्ता हिशोब द्यावा लागणार असल्याचे म्हटले आहे.

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीनं अटक केल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान वर्षा बंगल्यावर (Varsha Bunglow) मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि शरद पवार यांच्यामध्ये तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. संध्याकाळी पाच वाजता ही बैठक पार पडणार आहे. मलिकांवरील अटकेच्या कारवाईमुळं सरकारच्या अडचणीत वाढ झाल्यानं या बैठकीत नवाब मलिकांवर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

Pune Traffic News: गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत एक जूनपासून बदल, वाचा महत्वाची बातमी

Railway News: नागरिकांच्या प्रवासावर ब्लॉक नको; मेगा ब्लॉकवर मनसे आमदार राजू पाटील यांचे ट्विट

SCROLL FOR NEXT