Ahluwalia Construction Company will redevelop CSMT stations mumbai Sakal
मुंबई

CSMT Redevelopment : अहलुवालिया कंन्स्ट्रक्शन कंपनी करणार सीएसएमटी स्थानकांचे पुनर्विकास!

अहलुवालिया कंन्स्ट्रक्शन कंपनी करणार पुनर्विकास; २४५० कोटी रूपयांची बोली लावत कंपनीने मारली बाजी!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : नेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा पुनर्विकास काम लवकरच सुरू होणार आहे. सीएसएमतीच्या पुनर्विकास कामाची आर्थिक निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून यात अहलुवालिया कंन्स्ट्रक्शन कंपनीने बाजी मारली आहे. त्यामुळे आता सीएसएमटीचा पुर्णविकास काम अहलुवालिया कंन्स्ट्रक्शन कंपनी करणार असल्याचे निश्चित झाले आहे.

काही महिन्यांपूर्वी रेल लॅण्ड डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटीने (आरएलडीए) देशभरातील १४ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली होती. यात सीएसएमटी स्थानकाचाही समावेश होता. सीएसएमटीचा पुनर्विकास कामासाठी आरएलडीएने इच्छुक कंपन्यांकडून निविदा मागवल्या होत्या. त्यासाठी १८०० कोटी रूपये एवढा प्राथमिक खर्च प्रस्तावित केला होता.

त्यानुसार लार्सन टुर्ब्रे, अ‍ॅफकॉन इन्प्रâास्ट्रक्चर, अहलुवालिया कन्स्ट्रक्शन आणि नागार्जुन कन्स्ट्रक्शन या चार कंपन्या तांत्रिकदृष्ट्या पात्र ठरल्या होत्या. त्यानंतर आज आर्थिक निविदा उघडण्यात आल्या असून त्यामध्ये सर्वात कमी २४५० कोटींची निविदा अहलुवायिा कंपनीने भरल्याचे स्पष्ट झाले आहे.

तर लार्सन टुर्ब्रे ४१४१ कोटी, अ‍ॅफकॉन इन्प्रâास्ट्रक्चर ३९१०, आणि नागार्जुन कन्स्ट्रक्शनने ३६६७ कोटी रूपयांची निविदा भरली होती.अहलुवालिया कंन्स्ट्रक्शन कंपनीने सर्वात कमी २४५० कोटी रूपयांची बोली लावत बाजी मारली आहे. त्यामुळे पुनर्विकासाचे काम अहलुवालिया कंपनीलाच मिळणार असल्याची माहिती आरएलडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानी दिली.

असा होणार पुनर्विकास-

विमानतळाच्या धर्तीवर सीएसएमटी स्थानकाचे पुनर्विकास होणार आहे. सीएसएमटी स्थानकाची भव्य हेरिटेज वास्तू पाहण्यासाठी हॅरिटेज गॅलेरी उभारण्यात येणार आहे. फलाट क्रमांक १८ मध्ये प्रवेश केल्यानंतर कॅफे टेरिया, प्रवाशांना बसण्याची जागा केली जाणार आहे.स्थानकात प्रवाशांसाठी प्लाझा ,रिटेल, कॅफेटेरिया, करमणूक सुविधा असतील. फूड कोर्ट, वेटिंग लाउंज, स्थानिक उत्पादनांसाठी जागा उपलब्ध केली जाणार आहे. मेट्रो, बस वाहतुकीचे केंद्रीकरण करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Woman Army Officer : कोल्हापूरची ताराराणी दुश्मनाला करणार नेस्तनाबूत! २३ वर्षीय सई जाधवची IMA मध्ये ऐतिहासिक निवड, १६ पुरुषांमधून निवड

Asia Cup U19: भारताने दिलेली जखम पाकिस्तानच्या जिव्हारी! उपांत्य फेरीत न खेळताच जाणार घरी; बांगलादेश फायनलला पोहोचणार

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचा 80 जागांवरती दावा; 25 तारखेला पहिली यादी येणार

गोलाला छोटा भाऊ मिळाला! भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, घरी पुन्हा किलबिलाट

Uttar Pradesh: व्हिडिओकॉनचा UP मध्ये बनवणार टीव्ही आणि फ्रीज! ११०० कोटींची गुंतवणूक; ६००० जणांना मिळणार रोजगार

SCROLL FOR NEXT