Bus Accident sakal media
मुंबई

विरार : बसची दुचाकीला धडक; एक जागीच ठार तर दोघे गंभीर जखमी

महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच

संदिप पंडित

मुंबई : अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील (Ahmadabad National highway) वसई तालुक्याच्या हद्दीत एकापाठोपाठ एक अशा अपघाताच्या मालिका (vasai Accident update) सुरूच राहिल्या आहेत. आज सकाळी सातच्या सुमारास विरार (virar) फाट्याजवळ एका लक्झरी बस व दुचाकीमध्ये भीषण अपघात (bus and bike accident) झाल्याची घटना घडलीय. या अपघातात ट्रिपल सीट असलेल्या एकाचा जागीच मृत्यू (one death) झाला आहे तर दोन जण गंभीर जखमी (two people injured) झाले आहेत.

आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास गुजरातहून मुंबई दिशेने जाणाऱ्या लेनवर विरार फाट्याजवळ दुचाकी ट्रिपल सीट असलेल्या वाहकाला सोडण्यासाठी थांबली होती. इतक्यात रस्ता ओलांडत गाडीवरून उतरलेल्या वाहकाला भरधाव वेगात येणाऱ्या लक्झरी बसने धडक दिली. दरम्यान लक्झरी चालक पळून जायच्या तयारीत होता मात्र गाडीचा वेगावर नियंत्रण नसल्याने बस दुचाकीला धडकली.

या विचित्र अपघातात भाताने गावातील प्रकाश मोरे (40) या इसमाचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. विरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत लक्झरी चालकाला ताब्यात घेतले असून जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर बुधवारीही सकाळी साडेचारच्या सुमारास सातीवली येथील चढणीवर दुचाकीचा अपघात होऊन मागून येणारी गाडी अंगावरून गेल्याने वसईत राहणाऱ्या आकाश शर्मा व अर्जुन सिंग या दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राम मंदिर देणगी भ्रष्टाचार प्रकरणा विरोधात धुळ्यात महाविकास आघाडी आक्रमक

Sanjay Raut song on Sachin Ahir :'जे कधीच नव्हते आमचे त्याची वाट का पहावी?', संजय राऊतांची सचिन अहिरांवर गाण्यातून टीका

IND vs ENG : तो परतला... भारतीय संघाची ताकद वाढली, इंग्लंडची भलतीच कोंडी झाली! पहिल्याच सराव सत्रात नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : 'गोकूळ'साठी आघाडीचं आज शक्तिप्रदर्शन

Crime: फ्री मोमोजच्या बहाण्याने तरुणींना जाळ्यात ओढलं; नंतर धार्मिक स्थळी अश्लील व्हिडिओ बनवले अन्... रेहानचे भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT