Mahapareshan sakal
मुंबई

Mumbai News : विद्युत वाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी एआय तंत्रज्ञान वापरणार

महापारेषणद्वारे दुर्गम भागात `ईएचव्ही लाईन पॅट्रोलिंग'साठी ड्रोनचा वापर करण्याबाबतचा प्रयोग करण्यात येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - महापारेषणद्वारे दुर्गम भागात `ईएचव्ही लाईन पॅट्रोलिंग'साठी ड्रोनचा वापर करण्याबाबतचा प्रयोग करण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या यशस्वी प्रयोगांनंतर आता आर्टिफिशिअल तंत्रज्ञानाद्वारे तात्काळ बिघाड दुरुस्ती करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती महापारेषनने दिली.

सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर प्रकल्प राबवून सर्व शक्यतांचा आढावा घेतला जाईल. महापारेषण कंपनी दुर्गम भागात ड्रोनच्या सहाय्याने वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी व विजेचे वहन करण्यासाठी ड्रोनचा वापर करते आहे.

सद्यस्थितीत महापारेषण अति उच्च दाब वाहिनी आणि उपकेंद्रांचे स्कॅनिंग व देखरेख करण्यासाठी २४ ड्रोन वापरात आहेत. हे ड्रोन हाय रेझोल्यूशन, सामान्य व्हिजन व थर्मोव्हिजन कॅमेरा तसेच जीपीएस यंत्रणेसह सुसज्ज आहेत.

ड्रोन मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक देखभाल हेतूसाठी वापरले जात आहेत. विशेष म्हणजे अशा ठिकाणी जेथे कंडक्टर, टॉवर ॲक्सेसरीज,हार्डवेअर फिटींगची दृश्यमानता योग्य नसते. यामुळे अति उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांचे निरीक्षण कमी वेळेत पण अधिक अचूकपणे करता येते.

परिणामी, अति उच्च दाब वाहिनी आणि उपकेंद्रांमधील बिघाड कमी वेळेत दूर केले जातात व उच्चतम उपलब्धता राखली जाते. महापारेषण मधील सर्व अति उच्च दाब (संचलन व सुव्यवस्था) मंडळ व परिमंडळ कार्यालयात ड्रोन यंत्रणेचा वापर करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घरासमोर खेळत होती चिमुकली, आईच्या डोळ्यादेखत कारनं चिरडलं; २ सेकंदात श्वास थांबला, घटना CCTVत कैद

Pune waste Management: बीपीसीएल तयार, पण पुणे महापालिकेसमोर १२ एकर जागेचा पेच; कचऱ्यापासून गॅस प्रकल्पाला बायोमायनिंगचा अडथळा

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करावं- प्रसाद लाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT