Jodhpur Flight Diversion: मुंबईहून जोधपूरला निघालेले एअर इंडियाचे विमान AI645 काही तांत्रिक समस्येमुळे मुंबई विमानतळावर परत उतरवण्यात आले. एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, विमानाने उड्डाण घेताच ऑपरेशनल समस्या समोर आली. त्यानंतर, मुंबई विमानतळावर विमानाचे लँडिंग करण्यात आले.
याशिवाय त्यांनी सांगितले की, कॉकपिट क्रूने मानक कार्यपद्धतीनुसार उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि विमानाचे लँडिंग करण्यात आले. विमानातील प्रवाशांना त्यांच्या नियोजित ठिकाणी पोहचवण्यासाठी पर्यायी व्यवस्थाही करण्यात आली आहे.
ही घटना शुक्रवारी सकाळी घडली आणि याचे कारण तांत्रिक बिघाड असल्याचे सांगितले जात आहे. तथापि, पायलटने वेळीच निर्णय घेतल्याने मोठी दुर्घटना टळली. विमानातील प्रवासी काही काळ घाबरले, परंतु एअर इंडियाने दुसऱ्या विमानाने सर्वांना सुरक्षितपणे जोधपूरला पाठवले.
तिथे उपस्थित असलेल्या प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, विमानाचा वेग वाढत असताना अचानक एक झटका बसला आणि उड्डाण थांबले. यामुळे काही काळ प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते, परंतु क्रू मेंबर्स आणि पायलटने सर्वांना सर्वकाही सुरक्षित असल्याची खात्री दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.