Air India Mumbai Esakal
मुंबई

Air India Mumbai: व्हीलचेअर मिळाले नाही म्हणून..? मुंबई विमानतळावर वृद्ध व्यक्तीचा मृत्यू, एअरपोर्ट ऑथॉरिटीवर होतीय टीका

No wheelchair provided, Air India passenger in 80s dies after having to walk to Mumbai airport immigration: मुंबई विमानतळावर व्हीलचेअर न मिळाल्याने एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

मुंबई विमानतळावर व्हीलचेअर न मिळाल्याने एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, 80 वर्षीय व्यक्तीने न्यूयॉर्कहून मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये स्वतःसाठी आणि त्याच्या पत्नीसाठी तिकीट बुक केले होते. त्याचे तिकीट व्हीलचेअरच्या प्रवासासाठी होते. ही व्यक्ती सोमवारी मुंबई विमानतळाच्या इमिग्रेशन काउंटरवर अचानक कोसळली, त्यानंतर त्याचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, विमानतळावर व्हीलचेअर नसल्यामुळे त्यांना एकच व्हीलचेअर असिस्टंट मिळाला. वयोवृध्द व्यक्तीने आपल्या पत्नीला त्या व्हीलचेअरवर बसवले आणि पायी चालायचे ठरवले. वृत्तानुसार, वृद्ध व्यक्ती सुमारे 1.5 किलोमीटर चालल्यानंतर इमिग्रेशन क्षेत्रात पोहोचली आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांना विमानतळावरील वैद्यकीय उपचार करण्यात आले आणि तेथून नानावटी रुग्णालयात नेण्यात आले. हा वृद्ध भारतीय वंशाचा असून त्यांच्याकडे अमेरिकन पासपोर्ट होता.

वृत्तानुसार, वृद्ध व्यक्तीने व्हीलचेअर सेवेसाठी प्रीबुकिंग केले होते. रविवारी त्यांचे विमान न्यूयॉर्कहून निघाले होते. विमानात 32 व्हीलचेअर प्रवासी होते पण मुंबईला पोहोचल्यानंतर त्यांना मदत करण्यासाठी फक्त 15 व्हीलचेअर उपलब्ध होत्या. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने याबाबत सांगितले आहे की, व्हीलचेअरची प्रचंड मागणी असल्याने आम्ही प्रवाशाला थोडा वेळ थांबण्याची विनंती केली होती जेणेकरून व्हीलचेअरची व्यवस्था करता येईल, परंतु त्यांनी आपल्या पत्नीसोबत चालत जातो असं सांगितले.

यावर एअर इंडियाने काय म्हटले?

ही अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचे वर्णन करून एअर इंडियाने सांगितले की, आम्ही पीडितेच्या कुटुंबाच्या संपर्कात आहोत आणि त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य करत आहोत. विमानतळावर काम करणाऱ्या एका व्यक्तीने सांगितले की, आपण अनेकदा पाहतो की वृद्ध जोडप्यांना एकमेकांपासून वेगळे व्हायचे नसते किंवा त्यांना विमानतळ टर्मिनलपर्यंत विमानाने एकटे प्रवास करण्याची इच्छा नसते. ज्यांना चालण्यात अडचण येते ते विमानातून विमानतळ टर्मिनलवर जाताना पत्नी किंवा पतीसोबत राहणे पसंत करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"अपमान सहन करून ते कॉरिडॉरमध्ये बसून राहायचे" रंजनाच्या अपघातानंतर अशोक मामांच्या अवस्थेबद्दल खुलासा

Pune Fraud News : शेअर बाजारात चांगल्या परताव्याच्या आमिषाने ज्येष्ठाची दीड कोटींची फसवणूक

Rain-Maharashtra Latest Live News Update: शेतात विजेच्या धक्क्यामुळे एकाच कुटूंबातील पाचजण ठार

Online Gaming Bill 2025 : लोकसभेत 'ऑनलाइन गेमिंग विधेयक-२०२५' मंजूर!

Tirupati Balaji Temple : अशीही बालाजी भक्ती! तिरुपती मंदिरात भाविकाने दान केलं तब्बल १२१ किलो सोनं; किंमत ऐकून थक्क व्हाल....

SCROLL FOR NEXT