मुंबई

मुंबई शहराभोवती वायुप्रदूषणाचा फास...

सकाळवृत्तसेवा

मुंबई - दिल्लीप्रमाणे मुंबईभोवतीही वायुप्रदूषणाचा फास आवळला जात आहे. ‘प्रजा फाऊंडेशन’ने त्याकडे लक्ष वेधले आहे. मागील वर्षातील तब्बल २७९ दिवसांत मुंबईतील हवेचा स्तर निकृष्ट होता, असे संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावरून घेतलेल्या माहितीच्या आघारे त्यांनी असा निष्कर्ष काढला आहे.

‘प्रजा फाऊंडेशन’ने मुंबईतील हवामान आणि सामाजिक समस्यांबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, २०१८ मधील २७९ दिवस मुंबईतील हवा प्रदूषित होती. उर्वरित ८६ दिवसांतील हवेच्या स्तराची माहिती संकेतस्थळावर नव्हती, असे संस्थेचे मिलिंद म्हस्के यांनी सांगितले. त्या तुलनेत  २०१७ मध्ये ४५ दिवस आणि २०१६ मध्ये ६५ दिवस मुंबईतील हवा चांगली होती असे आढळले. २०१७ मध्ये १३४ आणि २०१६ मध्ये १७७ दिवस मुंबईतील हवा समाधानकारक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. २०१८ मध्ये मुंबईतील हवा १२५ दिवस मध्यम स्वरूपाची होती. २०१७ मध्ये १४४ दिवस आणि २०१६ मध्ये १०७ दिवस मुंबईची हवा मध्यम स्वरूपाची होती, असा निष्कर्षही अहवालातून काढण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होणार असल्याचे सूचक ‘प्रजा’ने दर्शवले आहे. कुर्ला, चेंबूर, गोवंडी, शिवाजी नगर, मानखुर्द आदी भागांत सर्वाधिक वायुप्रदूषण असल्याचे स्पष्ट झाले आहे. डम्पिंग ग्राऊंडलगत राहणाऱ्या नागरिकांना त्याचा फार त्रास होत आहे आणि त्यांच्यातील श्‍वसनविकार वाढू लागले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रिंकू सिंग 16 धावांवर बाद, कोलकाताचा अर्धा संघ परतला पॅव्हेलियनमध्ये

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT