Maharashtra Lockdown Updates sakal
मुंबई

टास्क फोर्सची बैठक संपली, आज रात्रीपासून राज्यात नवी नियमावली?

ओमकार वाबळे

राज्यातील वाढता कोरोनाचा आकडा पाहता प्रशासन सतर्क झालं आहे. सध्या राज्यात दररोज 10 हजारांच्या जवळपास रुग्ण सापडत असल्याने राज्य सरकारने महत्वाची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. ओमिक्रॉन आणि तिसऱ्या लाटेचं दुहेरी संकट पेलण्यासाठी सध्या मुंबई आणि पुण्यात शाळा बंद करण्यात आल्या आहेत. (Maharashtra Lockdown news)

राज्यात संध्याकाळी 9 ते सकाळी 6 पर्यंत जमावबंदी आहे. मात्र, परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी राज्य सरकार कडक निर्बंध लावण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मंत्रालयात तातडीची बैठक बोलवली. या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. (Maharashtra Mini Lockdown News)

राज्यात सध्या तरी लॉकडाऊन लावण्याच्या सरकार विचारात नाही(Maharashtra Lockdown Updates)

- लॉकडाऊनऐवजी राज्यात कडक निर्बंध लावण्याचा सरकारचा विचार

- राज्यातील सरकारी कर्मचार्‍यांच्या उपस्थिती ७५ ते ५० टक्क्यांवर आणली जाण्याची शक्यता

- शक्य असेल त्या खासगी कार्यालयात वर्क फ्रॉम होम लागू करण्याची शक्यता

- दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंटच्या वेळा कमी केल्या जाण्याची शक्यता

- राजकीय, धार्मिक कार्यक्रमांवर आणखी निर्बंध

- आरोग्यसेवा सज्ज ठेवण्याची सरकारची तयारी

- मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार

बैठकीतील महत्वाचे मुद्दे (Maharashtra Task Force)

राज्यात लॉकडाऊन लावण्याबाबत राज्य सरकारचा नकारात्मक

नाईट कर्फ्यूची घोषणेवर सरकार विचार करणार

दिल्ली, कर्नाटक प्रमाणे 'वीकएंड कर्फ्यू'संदर्भात प्रस्ताव विचाराधीन

दुसरा डोस राहिलेल्या नागरिकांचं लसीकरण वेगाने होणार

राज्यातील सर्वांपर्यंत लस पोहोचवण्यासाठी सरकार गती वाढवणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT