Ajit pawar sakal
मुंबई

Ajit pawar : राजकारणातील मग्रुरी अजितदादांनी अनेकदा दाखवलीच; भाजपच्या बड्या नेत्याची जहरी टीका

भाजपचे विधानपरिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अजितदादांनी राजकारणातील मग्रुरी अनेकदा आपल्या विधानांमधून दाखवली आहे. तर अमोल मिटकरी यांच्याबाबत मुंगेरीलाल के हसीन सपने असेच म्हणावे लागेल, असा टोला भाजपचे विधानपरिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.

राज्य सरकार कोसळण्याबाबत मिटकरी यांनी केलेल्या विधानांवरून दरेकर यांनी त्यांच्यावर हल्ला चढवली आहे. संजय राऊत यांनीही यापूर्वी सतत अशाच तारखा देऊनही सरकारला सात महिने पूर्ण झाले. त्यामुळे हे सरकार सदैव विनाअडथळा चालण्यासाठी मिटकरी यांनीही असेच भविष्य सांगत राहावे, अशी गमतीदार टीकाही दरेकर यांनी केली. राष्ट्रवादी आणि शिवसेना (उद्धव गट) या पक्षातून सुरु असलेले आऊटगोईंग रोखण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

राजकारणातील मग्रूरी अजित पवार यांनी आपल्या विधानाने अनेकदा दाखवली आहे. जो विषय शांत झाला होता तरीपण मी माझ्या विषयाशी ठाम आहे दाखवून अरेरावी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. शरद पवार यांनीही संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणण्यास हरकत नाही असे सांगितले, त्याला छेद देण्याचा अजित पवारांचा प्रयत्न नाही ना, अशी शंका येत असल्याचेही दरेकर म्हणाले.

शिवसेनेने मुंबईकरांच्या घामाचा पैसा २५ वर्षे लुबाडला त्याचे प्रथम आदित्य ठाकरे यांनी उत्तर द्यावे. तर निवडणुकांबाबत संजय राऊत यांचे वक्तव्य म्हणजे केवळ राजकीय नौटंकी आहे. निवडणुकांचे वेळापत्रक सरकार ठरवीत नाही. तरीही सर्व ताकदीनीशी भाजपा निवडणुकीला सामोरे जाण्यास सज्ज आहे. संजय राऊत यांनी शिवसेनेची वाट लावली असून त्यांचा उद्देश सफल झाला आहे. त्यांची गांधी घराण्याशी असणारी जवळीक आता बाहेर येत आहे. राऊत काँग्रेसमय झाले असून त्यांनी लोकांमधून निवडून यावे, असे आव्हानही दरेकर यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

केमिकल कंपनीत अग्नितांडव, ८ कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू; लागोपाठ स्फोट अन्...

Pune News: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे पुण्याहून रेल्वेच्या सेवेत वाढ; नेमक्या कशा धावणार गाड्या..

SCROLL FOR NEXT