Ajit tungar sakal media
मुंबई

पाण्यात पोहण्याचा मोह जीवावर बेतला; तरुणाचा तानसा धरणात बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

खर्डी : तानसा धरणातील खोल पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू (boy drowned in tansa dam) झाला. शहापूर महाविद्यालयातील मित्रासोबत मौज, मजा-मस्ती करण्यासाठी गेलेल्या या तरुणाला पाण्यात पोहण्याचा मोह (swimming wish) झाला व त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. शहापूर (shahapur) तालुक्यातील कसाऱ्यालगत पाटोळ येथे राहणारा अजित पंढरीनाथ तुंगार (वय २०) महाविद्यालयीन मित्रांसोबत रविवारी तानसा धरणावर सहलीसाठी गेला होता.

दरम्यान, पोहण्याच्या मोहापायी अजित इतर मित्रांसोबत तानसा धरणाच्या पाण्यात उतरला. दुपारच्या वेळी पोहत असताना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने अजित पाण्यात बुडत असताना एका तरुणाने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याची खोली अधिक असल्याने अजित पाण्यात बुडाला.

या घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलिस व जीवरक्षक टीमचे सदस्य प्रदीप गायकर, रमेश डिंगोरे, राहुल जयस्वाल आणि सचिन परदेशी यांनी घटनास्थळ गाठून तानसा धरणाच्या पाण्यात उतरून बुडालेल्या युवकाचा शोध घेण्यास सुरुवात केली. संध्याकाळी अंधार पडल्यानंतर शोध मोहिमेत अडथळा येत असल्याने सोमवारी सकाळी स्थानिकांच्या मदतीने शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर दुपारी दीडच्या सुमारास तानसा परिसरातील स्थानिक ग्रामस्थांनी अजितचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार 4 पट वाढणार? रेल्वे युनियनचा मोठा प्रस्ताव; कोणाचा पगार किती वाढणार?

FACT CHECK : वैभव सूर्यवंशीला Mumbai Indians कडून ३० कोटींची ऑफर; ललित मोदीने सत्य समोर आणलं, नेमकं काय सुरूय?

CBSE च्या नव्या नियमाने विद्यार्थ्यांवर संकट? त्रिभाषा धोरणावर सुप्रीम कोर्ट संतापले, केंद्र सरकारला नोटीस!

'मराठी असून हिजाब का घातला?' अंकिता लोखंडेला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, पोस्ट Viral

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतोय! सिद्धरामय्यांची घोषणा, डीके शिवकुमार यांनी चरणस्पर्श करत घेतले आशीर्वाद

SCROLL FOR NEXT