Akshay Shinde Funeral Updates Esakal
मुंबई

Akshay Shinde Funeral: एन्काउंटर झालेल्या अक्षय शिंदेच्या मृतदेहाचे का करत आहेत दफन? कुटुंबीयांनी का घेतला असा निर्णय?

Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेच्या मृतदेहावर बदलापूरमध्ये अंत्यसंस्कार होऊ देणार नाही अशी भूमिका स्थानिकांनी घेतल्यानंतर न्यायालयाने प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.

आशुतोष मसगौंडे

बदलापूरच्या शाळेतील अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचे आरोप असलेल्या अक्षय शिंदेचा दोन दिवसांपूर्वी पोलीस चकमकीत मृत्यू झाला होता. या पोलीस चकमकीवर आरोपीच्या कुटुंबीयांनी प्रश्न उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

दरम्यान अक्षय शिंदेच्या मृतदेहावर बदलापूरमध्ये अंत्यसंस्कार होऊ देणार नाही अशी भूमिका स्थानिकांनी घेतल्यानंतर न्यायालयाने प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.

अशात अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनी त्याच्या मृतदेहाचे दहन न करता तो दफन करण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यात जर काही पुरावे लागले तर अक्षयचा मृतदेह बाहेर काढता येईल यासाठी त्याच्या कुटुंबियांनी हा निर्णय घेतला आहे.

काय आहे घटना?

गेल्या महिन्यात बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत दोन विद्यार्थिनींचा लैंगिक छळ झाल्याच्या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.

शाळेतील स्वच्छतागृहे साफ करणाऱ्या अक्षय शिंदेवर मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला होता. ही घटना 12 आणि 13 ऑगस्ट रोजी चार आणि सहा वर्षांच्या मुलींसोबत घडली होती. यानंतर संतप्त नागरिकांनी बदलापूर स्थानक जाम करत रेल्वे वाहतूक रोखली होती.

एन्काउंटर

बदलापूर येथील शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्या बदलापूर बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला.

अक्षय शिंदेला तळोजा कारागृहातून ठाणे येथे उपचारासाठी नेत असताना पोलिस आणि अक्षय शिंदे यांच्यात चकमक झाली. या चकमकीत पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान अक्षय शिंदेबरोबर पोलिसांची झालेली ही चकमक बनावट होती, असा आरोप करण्यात येत आहे. यावरून विरोधकही आक्रमक झाले आहेत.

बदलापूर चकमकीच्या घटनेनंतर पोलिसांनी सांगितले की, आरोपीला उपचारासाठी नेले जात असताना त्याने एका हवालदाराची बंदूक हिसकावून पोलीस अधिकाऱ्यावर गोळीबार केला.

या गोळीबारात सहायक पोलीस निरीक्षक नीलेश मोरे जखमी झाले. त्यानंतर पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी झाडलेली गोळी लागल्याने अक्षय शिंदेचा मृत्यू झाला.

हायकोर्टाची मोठी टिप्पणी

अक्षय शिंदेच्या मृत्यूप्रकरणी उच्च न्यायालयाने मोठी टिप्पणी केली आहे. न्यायालयाने म्हटले की, प्रथमदर्शनी चकमकीत काहीतरी गैरप्रकार झाल्याचे दिसते. याचबरोबर न्यायालयाने पोलिसांना विचारले की त्यांनी थेट डोक्यात गोळी झाडली का? पिस्तूलवरील बोटांचे ठसे तपासण्याचे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले आहेत.

न्यायालयाने म्हटले की, आम्ही त्याला एन्काऊंटर म्हणू शकत नाही, त्याची व्याख्या वेगळी आहे. चार पोलिस मिळूनही आरोपी अक्षय शिंदेला कसे रोखू शकले नाहीत. याबाबतही न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले. पोलिसांनी आरोपींवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा होता, असे न्यायालयाने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

SCROLL FOR NEXT