alcohol and sexual assault mumbai crime police kalyan railway station  Sakal
मुंबई

Mumbai Crime : कल्याण रेल्वे स्टेशनवर पुन्हा घडला तो प्रकार; दारू पिऊन टल्ली झालेल्या तरुणाने काढली महिलेची छेड

लोकांची गर्दी पाहून स्टेशन परिसरात गस्त घालणाऱ्या रेल्वे पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात एका गर्दुल्याने प्रवासी महिलेला मिठी मारत तिचा विनयभंग केल्याची घटना घडून महिना होत नाही तोच पुन्हा एकदा कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात तसाच प्रकार घडला.

रविवारी रात्री दारूच्या नशेत टल्ली असलेल्या एका तरुणाने प्रवासी महिलेची छेड काढली. महिलेने आधी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र त्या तरुणाने अश्लील कृत्य करण्यास सुरवात करत्वच संतप्त झालेल्या महिलेने आरडा ओरडा करत त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.

फलाटावरील प्रवाशांनी देखील त्याला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसरात महिला सुरक्षित असल्याचे दिसून येत आहे. महिनाभरापूर्वी घडलेल्या घटनेनंतर रेल्वे पोलिस व आरपीएफने स्टेशन परिसरात कारवाई केली. मात्र त्यात सातत्य न ठेवल्याने आणखी एक महिलेवर हा प्रसंग बितला.

कल्याण रेल्वे स्थानकावर वरील फलाट क्रमांक 1 वर सायंकाळी साडे आठ ते नऊ वाजेच्या सुमारास पीडित महिला ट्रेन पकडण्यासाठी चालत जात होती. अचानक एक दारूच्या नशेत धुत असलेल्या माथेफिरू तरुणाने तिची छेड काढण्यास सुरवात केली.

महिलेने आधी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. मात्र त्या तरुणाने तिच्या सोबत अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. महिलाने आरडाओरडा करत तरुणाला विरोध करण्यास सुरवात केली. मग काय संतप्त झालेल्या महिलेने व प्रवाश्यानी छेड काढणाऱ्या तरुणाला स्टेशनवरच चोप देण्यास सुरुवात केली.

लोकांची गर्दी पाहून स्टेशन परिसरात गस्त घालणाऱ्या रेल्वे पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेत दारूच्या नशेत धुत असलेल्या तरुणाला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला. दरम्यान महिनाभरापूर्वी एक माथेफिरू गर्दुल्याने कामाला जाणाऱ्या महिलेला मिठी मारल्याची घटना ताजी असताना पुन्हा ही घटना घडल्याने स्टेशन परिसरात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मनसेच्या आंदोनानंतर जागे झालेल्या रेल्वे पोलीस व आरपीएफ प्रशासनाने स्टेशन परिसरात कारवाई करत 33 जणांना ताब्यात घेतले होते. मात्र या कारवाईत पुढर सातत्य दिसले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा हा प्रकार घडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Alert: ₹15 हजारांचे होऊ शकतात ₹20 हजार! 33% GMP सह 631 कोटींचा IPO आजपासून खुला; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

Mumbai Electricity: मुंबईत वारंवार वीजपुरवठा खंडित, मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा प्रशासनावर संताप; आंदोलनाचा इशारा

Delhi Restaurant Fire : दिल्लीत रेस्टॉरंटमध्ये भीषण आग, २१ जणांचा होरपळून मृत्यू; आपचे माजी आमदार घटनास्थळी दाखल

फक्त एका ट्रिकने Instagram हॅक! Meta AI मधील त्रुटीचा गैरवापर; लाखो अकाउंट्सवर हॅकर्सचा हल्ला, सुरक्षेसाठी लगेच करा 'हे' काम

सचिन पिळगावकरांवर जीवापाड प्रेम करायची ही अभिनेत्री; पण 'या' व्यक्तीमुळे नाही होऊ शकलं लग्न, अखेर...

SCROLL FOR NEXT