मुंबई

दारू अत्यावश्यक वस्तू नाही! दारू व्यापाऱ्यांचा सर्वोच्च न्यायालयाकडूनही हिरमोड...

सुनिता महामुनकर


मुंबई : लाॅकडाऊनमध्ये दुकानांमधून दारूविक्री करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करणाऱ्या विक्रेत्यांना आज सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. दारू ही अत्यावश्यक वस्तू नाही, असेही न्यायालयाने सुनावले आहे.  त्यामुळे तूर्तास तरी दुकानांमध्ये थेट दारु विक्री होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. 

राज्यात मुंबईसह अनेक महापालिकांनी ऑनलाईन दारूविक्रीस परवानगी दिली आहे. मात्र, कोरोना संसर्गाचा धोका पाहता प्रत्यक्ष दुकानात जाऊन दारु विकत घेण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. याविरोधात महाराष्ट्र दारु व्यापारी संघटनेने यापुर्वी मुंबई उच्च न्यायालात दाद मागितली होती. मात्र, न्यायालयाने महापालिकेकडे दाद मागा, असे सुचविले होते. त्यामुळे संघटनेने सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती आर सुभाष रेड्डी आणि न्यायमूर्ती एम आर शहा यांच्या खंडपीठापुढे यावर आज सुनावणी झाली. 

मुंबई महापालिकेकडे थेट दारू विक्रीबाबत निवेदन दिले आहे. मात्र, त्यावर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. ऑनलाईन दारु विक्री करणे अडचणीचे होत आहे, असे याचिकादारांंकडून अॅड चरणजीत चंदरपाल यांनी सांगितले. महापालिकेला निर्णय घेण्यासाठी अवधी निश्चित करुन द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर दारू ही काही अत्यावश्यक वस्तू नाही. त्यामुळे आम्ही हस्तक्षेप करणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट करत याचिका नामंजूर केली. 

परवानगी महापालिकाच देणार
मुंबई महापालिकेने दिलेल्या ऑनलाईन दारू विक्रीच्या निर्णयाला संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात प्रथम आव्हान दिले होते. मात्र, उच्च न्यायालयाने महापालिका स्थानिक परिस्थितीनुसार धोरणात्मक निर्णय घेत असते. सध्याच्या साथीच्या परिस्थितीत अनेक बाबींचा विचार करून निर्णय घेतला आहे. त्यामुळे महापालिकेकडे दाद मागा, असे उच्च न्यायालयाने सुचविले होते. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय कायम ठेवला आहे.

--------------------------------------------------------

Edited by Tushar Sonawane

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: भारताला विजयाची संधी, पण पाऊस थांबणार कधी? शेवटच्या दिवशी खेळ झाला नाही तर काय, जाणून घ्या

'पुन्हा तोच बसस्टॉप' तेजश्री दिसणार जुन्या स्टॉपवर, फोटो शेअर करत म्हणाली, 'तेच ठाणे, तेच ठिकाण आणि तेच तुम्ही..'

Manmad News : मनमाड बाजार समितीच्या अडचणींवर मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक

Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी गळा दाबून मारलं, नंतर ग्रॅनाइट मशीनने पत्नीचा शिरच्छेद अन्...; विक्षिप्त पतीचं कृत्य

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

SCROLL FOR NEXT