अलिबाग : सरकारी कार्यालयांसह अनेक खासगी कार्यालयांना मिळालेल्‍या सलग सुट्टीमुळे अलिबाग समुद्रकिनारा हाऊसफुल्ल झाला होता.
अलिबाग : सरकारी कार्यालयांसह अनेक खासगी कार्यालयांना मिळालेल्‍या सलग सुट्टीमुळे अलिबाग समुद्रकिनारा हाऊसफुल्ल झाला होता. 
मुंबई

पर्यटकांच्‍या गजबजाटाने अलिबागचे समुद्रकिनारे फुलले

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग (बातमीदार) : गुरुनानक जयंतीनिमित्त सरकारी कार्यालयांसह अनेक खासगी कार्यालयांना सुट्टी होती. त्यामुळे सुटीचे निमित्त साधत मंगळवारी अलिबाग, नागाव, वरसोली, किहीम, आक्षी, रेवदंडा अशा अनेक समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांनी गर्दी केली होती. त्यामुळे घोडागाडी, स्पीड बोट मालकांचा व्यवसाय तेजीत होता. अनेक पर्यटकांनी घोडागाडी, उंटावर बसून समुद्र सफारी व सेल्फीचा आनंद घेतला. त्यामुळे येथील समुद्रकिनारे पर्यटकांच्या गर्दीमुळे फुलले होते. या वेळी खोल समुद्रात पोहण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांना खबरदारीचा इशारा जीवरक्षकांकडून देण्यात आला.

सरकारी कार्यालयांसह अनेक खासगी कार्यालयांना शनिवार व रविवारी सुट्टी होती. फक्‍त सोमवारी सरकारी कार्यालये सुरू होती. मात्र, मंगळवारी गुरुनानक यांची जयंती असल्याने पुन्हा सरकारी सुट्टी होती. त्यामुळे सुट्ट्यांचे गणित जुळवत अनेक पर्यटकांनी अलिबागचा रस्ता धरला. त्यामुळे येथील हॉटेल, रिसॉर्टमध्ये पर्यटकांकडून काही दिवसांपूर्वीच आगाऊ नोंदणी करण्यात आली होती. त्यामुळे अनेक समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळाली. पर्यटकांनी घोडागाडी, उंटावर बसून समुद्र सफारी व सेल्फीचा आनंद घेतला. काही पर्यटकांनी मित्रांसमवेत, तर काही पर्यटकांनी त्यांच्या कुटुंबीयांसमेवत समुद्रकिनारी मौजमजा केली. सुट्टीचा दिवस असल्याने पोलिसांनीदेखील पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पावले उचलली होती. 

अलिबाग हे पर्यटनासाठी चांगले शहर आहे. या ठिकाणी सुट्टीचा आनंद घालविण्यासाठी वारंवार येत असतो. समुद्रकिनारी स्पीड बोट व अन्य समुद्र खेळांचा आनंद घेता येतो. हा किनारा स्वच्छ व सुंदर असल्याचे पर्यटक सचिन दिसले यांनी सांगितले.

जीवरक्षक तैनात
अलिबाग, नागाव, किहीम, रेवदंडा, आक्षी अशा अनेक समुद्रकिनारी पोलिस तैनात करण्‍यात आले होते. महिलांची छेडछाड काढणाऱ्यांवर पोलिसांची नजर होती. अलिबाग, नागाव या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जीवरक्षकही तैनात करण्यात आले होते. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : आघाडीत आतापासूनच ‘तुपा’वरून भांडणे; पंतप्रधान मोदींची टीका

Loksabha Election 2024 : या आहेत सहाव्या टप्प्यातील प्रमुख लढती

Drinking Water : पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; मुख्यमंत्र्यांनी घेतला टंचाईचा आढावा

Sambit Patra : संबित पात्रांच्या विधानाचे पडसाद मतपेटीवर?

Kalyaninagar Accident : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणाच्या तपासासाठी दहा पथके नियुक्त

SCROLL FOR NEXT