Jumbo-Covid-Center Sakal
मुंबई

रूग्णसंख्या घटल्याने मुंबईतील जम्बो कोविड सेंटर्स बंद होणार; पालिकेचा निर्णय

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान या ठिकाणी लाखो रूग्णांवर उपचार करण्यात आले होते.

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Jumbo Covid Centers : मुंबईतील सर्वात मोठी कोविड सेंटर्स बंद करण्याचा निर्णय महापालिकेकडून घेण्यात आला आहे. नव्याने बाधित होणाऱ्या आणि रूग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या घटल्याने ही मुंबईतील सर्व जम्बो कोविड सेंटर्स बंद केली जाणार आहेत.

महाराष्ट्रासह मुंबईत कोरोनाचे थैमान वाढल्यानंतर अनेक रूग्णालयांमध्ये बेड शिल्लक नसल्याने उपचारांना विलंब होत होता. त्या पार्श्वभूमीवर रूग्णांवरील उपचारांसाठी हे जम्बो कोविड सेंटर्स उभारण्यात आली होती. गेल्या दोन वर्षांपासून हे कोविड सेंटर्स सुरू होते. या काळात कोरोनाच्या दोन लाटा आल्या त्यावेळी अनेक रूग्णांवर या ठिकाणी उपचार केले गेले. मात्र, आता कोरोनाच्या रूग्णसंख्येत घट होत असल्याने ही सर्व जम्बो कोविड सेंटर्स बंद करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेकडून घेण्यात आला आहे.

मुंबईतील एकूण आठ जम्बो कोविड सेंटर्स बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पहिल्या टप्प्यात तीन जम्बो सेंटर्स यापूर्वीच बंद करण्यात आली आहेत. तर आता दुसऱ्या टप्प्यात पाच कोविड सेंटर्स बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यात बंद करण्यात येणाऱ्या कोविड सेंटर्समध्ये सर्वात मोठ्या कोविड सेंटर्सचा समावेश असून, यात बीकेसी, भायखळा, मुलुंड, वरळी आणि मालाड येथील जम्बो कोविड सेंटर बंद करण्यात येणार आहे.

बंद करण्यात येणारी ही सर्वात मोठी जम्बो कोविड सेंटर्स होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान या ठिकाणी लाखो रूग्णांवर उपचार करण्यात आले होते. या ठिकाणी 12 हजार 375 बेड आणि 907 अतिदक्षता बेड या कोविड सेंटर्समध्ये होत्या. या कोविड सेंटर्समुळे मुंबईतील मृत्यू कमी करण्यास मोलाची मदत झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT