Palghar Politics sakal
मुंबई

Palghar Politics: बहुजन विकास आघाडीच्या विरोधात संभाव्य उमेदवारांची नावे आली समोर, वाचा इनसाईड स्टोरी

Vasai Nalasopara and Boisar Political Update: स्थानिक उमेदवार` या मुद्द्यावर क्षितिज ठाकूर यांनी बाजी मारून नेली होती.

सकाळ वृत्तसेवा

Nalasopara: पालघर लोकसभा निवडणुकीच्या निकालाने आगामी विधानसभा निवडणुकीतील उत्सुकता प्रचंड वाढवली आहे. विशेषत: वसई, नालासोपारा व बोईसर या तीन मतदारसंघांत बहुजन विकास आघाडीला न भुतो अशी पिछेहाट मिळाल्यानंतर विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना बळ प्राप्त झाले आहे. साहजिकच या तीनही मतदारसंघांतून संभाव्य उमेदवारांची नावे आणि त्यांच्यात होणाऱ्या लढती यांच्या चर्चा सुरु झाल्या आहेत आहेत.

नालासोपारा मतदारसंघात 2017 साली शिवसेना विरुद्ध बहुजन विकास आघाडी अशी लढत झाली होती. या मतदारसंघात बिगर महाराष्ट्रीयन मतदारांची लक्षणीय संख्या लक्षात घेऊन त्या वेळी शिवसेनेने प्रदीप शर्मा यांना उमेदवारी देऊन या लढतीत रंगत आणण्याचा प्रयत्न केला होता. तर बहुजन विकास आघाडीकडून क्षितिज ठाकूर मैदानात होते. परंतु ‘स्थानिक उमेदवार` या मुद्द्यावर क्षितिज ठाकूर यांनी बाजी मारून नेली होती. शिवसेनेने प्रदीप शर्मा हरले तरी त्यांनी बविआला पळताभुई थोडी केली होती.

लोकसभा निवडणुकीत नालासोपारा विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीला तिसऱ्या क्रमांची मते प्राप्त झाली आहेत. ही बाब बहुजन विकास आघाडीत चिंता निर्माण करणारी आहे. पण महायुतीत चैतन्य निर्माण करणारी आहे. त्यामुळे या मतदारसंघातून भाजप आपला उमेदवार देईल, अशी शक्यता आहे. भाजपकडून तूर्त राजन नाईक यांचे नाव पुढे येत आहे. राजन नाईक यांचे भाजप नेते विनोद तावडे यांच्याशी चांगले संबंध आहेत. फडणवीसांची लोकसभा निवडणुकीतील सुमार कामगिरी पाहता विनोद तावडे यांच्यावर विधानसभा निवडणुकीची जबाबदारी येण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास राजन नाईकच उमेदवार असतील, यावर भाजप कार्यकर्त्यांना ठाम विश्वास आहे.

राजन नाईक हे मागील काही वर्षांपासून या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची मनीषा बाळगून आहेत. 2014 साली त्यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्या वेळी शिवसेना, बविआ व भाजप अशी तिरंगी लढत झाल्याने त्यांना हार पत्करावी लागली होती. या वेळी परिस्थिती मात्र उलट आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना भाजपसोबत आहे. शिवाय लोकसभा निवडणुकीतील विजय आणि बिगर महाराष्ट्रीयन मतदारांची लक्षणीय संख्या भाजपचा विजय सोपा करू शकेल. सोबतच राजन नाईक यांची या मतदारसंघात स्वत:ची अशी बांधणी आहे. पण महायुतीतून नालासोपारा मतदारसंघातील बिगर महाराष्ट्रीय मते विशेषत: उत्तर भारतीय मते मोठ्या प्रमाणात मिळविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवीन दुबे यांचे नाव पुढे करू शकतील, असे सांगितले जात आहे. नवीन दुबे हे यांचे महाराष्ट्रासोबत अनोखे नाते आहे.

पिढ्यान पिढ्या त्यांचे कुटुंब नालासोपारा येथील रहिवासी आहेत. ठाकूर कुटुंबीयांसोबत त्यांचे पूर्वीपासून वितुष्ट आहे. त्यांचा हा संघर्ष महायुतीला विजयात परावर्तीत करणे सोपे जाऊ शकते. किंबहुना माजी आमदार विवेक पंडित यांचे ते जावई आहेत. श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून भाजपचा मार्ग त्यांनी सुकर केला होता.

आमदार हितेंद्र ठाकूर यांचा बालेकिल्ला असलेल्या वसईत तब्बल 10 हजारांचे मताधिक्क्य मिळवून देण्यात विवेक पंडित यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे. या सगळ्या जमेच्या बाजू पाहता नवीन दुबे यांचे नाव महायुतीतून निश्चित होईल, अशी शक्यता आहे.

दरम्यान; एकेकाळी बांधकाम व्यावसायिक आणि पालिका अधिकारी यांच्या उरात धडकी भरवणारे धनंजय गावडे पुन्हा एकदा राजकीय पदार्पण करण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी ‘स्वराज अभियान`च्या माध्यमातून नालासोपारा मतदारसंघातून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. एके काळी शिवसेनेचा वाघ म्हणून गावडे यांच्याकडे पाहिले जात होते. परंतु आता मात्र गावडे यांनी अजून तरी कुठल्या पक्षातून निवडणूक लढविणार हे गुलदस्त्यात ठेवल्याने अनेक तर्क वितर्क केले जात आहेत.

धनंजय गावडे यांना मागील सहा वर्षांत संघर्षांतून जावे लागले होते. हा संघर्ष किंवा त्यांच्या कडून कळत-नकळत चुका घडल्या नसत्या तर आज ते नालासोपारा मतदारसंघातून आमदार असू शकले असते. पण ही कमी ते या निवडणुकीत भरून काढू शकतील. किंबहुना तेच ‘जाएंट किलर` ठरतील, असाही एक मतप्रवाह आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नालासोपारा मतदारसंघात राजकीय घडामोंडींनी वेग पकडला असताना स्थानिक बहुजन विकास आघाडी कोणता ‘स्टँड` घेते, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. विद्यमान आमदार क्षितिज ठाकूर तीन वेळा आमदार राहिलेले आहेत. परंतु या लोकसभा निवडणुकीत बसलेला ‘सेटबॅक`पाहता. या निवडणुकीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मोठी मेहनत करावी लागणार असल्याने आता पासूनच कार्यकर्त्यांना कमला लागण्याच्या सूचना बविआच्या नेतृत्वाकडून दिल्या असल्याने यावेळी नालासोपाराची निवडणूक चांगलीच रंगतदार होणार असॅडीस्ट आहे.

तूर्त भाजपकडून राजन नाईक, शिवसेना नवीन दुबे आणि स्वराज अभियानकडून धनंजय गावडे यांची मात्र मतदार संघात जोरदार चर्चा मात्र रंगू लागली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Viral Video : सुनेची आईसोबत मिळून सासुला बेदम मारहाण; झिंज्या पकडल्या, उचलून आपटलं अन्... व्हिडिओ व्हायरल

CA Result Success Story: अभ्यासातील सातत्य, जिद्दीच्या बळावर साकारले स्वप्न; राजनवर कौतुकाचा वर्षाव; सीए परीक्षेत ६०० पैकी मिळविले ५१६ गुण

Oneplus Nord CE 5 : वनप्लस Nord CE 5 लवकरच होणार लॉन्च; 7100mAh दमदार बॅटरी, आकर्षक फीचर्स अन् किंमत फक्त..

SCROLL FOR NEXT