Alliance Air flight  ANI
मुंबई

अवघडचंय! बिना इंजिन कव्हर विमानाचा मुंबई ते भुज प्रवास; चौकशीचे आदेश

ही घटना बुधवारी सकाळी 6.30 वाजता मुंबई विमानतळावर घडली.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : इंजिन कव्हरशिवाय विमानने मुंबई ते भुजचा प्रवास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, ही घटना घडली त्यावेळी विमानात 70 प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने हे विमान सुरक्षितपणे भुज विमानतळावर उतरवण्यात आले. इंजिन कव्हर पडल्याची बाब लक्षात येताच वाहतूक नियंत्रक (ATC) कर्मचाऱ्यांनी तात्काळ वैमानिकाला याची माहिती दिली. मात्र असे असतानाही वैमानिकाने विमान पुढे नेले. दरम्यान, या घटनेच्या चौकशीचे आदेश नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) दिले आहेत. ही घटना बुधवारी सकाळी 6.30 वाजता घडली. याबाबत एनएनआयने ट्वीट केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अलायन्स एअरचे विमानाने बुधवारी सकाळी 6.30 वाजता भुजकडे जाण्यासाठी उड्डाण घेतले. दरम्यान, एअरस्ट्रीपमधून बाहेर पडताना विमानाच्या इंजिनचे कव्हर (कॉल) खाली पडले. मात्र, याकडे दुर्लक्ष झाले आणि विमानाचा भुजकडचा प्रवास सुरू झाला. धक्कादायक बाब म्हणजे ही घटना घडली त्यावेळी विमानात 70 प्रवासी प्रवास करत होते. याबाबत बोलताना नागरी विमान वाहतूक महासंचालक (DGCA) अरुण कुमार म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी केली जात असून, अहवालानंतर आवश्यक ती कारवाई केली जाईल असे सांगितले आहे.

मोठा अनर्थ टळला

विमानाच्या इंजिनावरील कव्हरला 'कॉल' म्हणतात. हे इंजिनला बाहेरील वस्तूंपासून सुरक्षित ठेवण्याचे काम करते. मात्र, कॉलशिवाय या विमानाने प्रवास केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कारण, कॉल नसल्याने उड्डाण दरम्यान यामध्ये हवेतील एखादी वस्तू थेट इंजिनमध्ये अडकण्याची शक्यता अधिक असते. यामुळे विमानाच्या अपघाताची मोठी शक्यता होती. मात्र, सुदैवाने असे काही घडले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 'शेतापर्यंत आता हक्काचा रस्ता; गावनिहाय शिवारफेरी, रस्त्याला संकेतांक मिळणार; वादावादी मिटणार

CET 2025 : आता केंद्रांपर्यंत जाणे हीच ‘परीक्षा’, सारथी, बार्टी, महाज्योतीचा भोंगळ कारभार; विद्यार्थ्यांना फटका

Nagpur Crime: अकरा वर्षीय मुलाची अपहरण करून हत्या; खापरखेडा जवळील चनकापूर हादरले, तिघांना अटक

Latest Maharashtra News Updates : कुख्यात गुंड छोटा राजनचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

Fake Farmer Card: सिल्लोडमध्ये बनावट ‘फार्मर कार्ड’; योजनेच्या नावाखाली केंद्रचालकांकडून शेतकऱ्यांची फसवणूक

SCROLL FOR NEXT