मुंबई

जेव्हा ऍमेझॉनचे मालक स्वतः देतात पॅकेजची डिलेव्हरी..

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - जेफ बेझोस हे तीन दिवसीय भारत दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी देशभरातील काही प्रमुख उद्योजकांशी संवाद साधला. याचसोबत ते बॉलिवूड कलाकारांना देखील भेटलेत. या व्यतिरिक्त त्यांनी एक काम केलंय ज्यामुळे जेफ हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. जेफ हे जगातील सर्वात श्रीमंत  व्यक्ती आहेत. यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर दोन फोटो शेअर केलेत. हे फोटो नक्की कसले आहेत? जेफ हे फोटोमध्ये 'जे' काम करताना दिसतायत त्यामुळे मुंबईकर त्यांच्यावर भलतेच खुश झालेत. नक्की काय केलंय जेफ यांनी, जाणून घेऊयात.  

त्यांनी काय केलंय हे सांगण्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो की जेफ हे ऍमेझॉन या कंपनीचे CEO आहेत. त्यांनी शेअर केलेल्या फोटोवर हजारो लाईक्स आणि साडेचारशेपेक्षा अधिक अभिप्राय आले आहेत.   

काय लिहिलंय जेफ यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये

"संपूर्ण भारतात अनेक दुकानदार हे ऍमेझॉनचे भागीदार आहेत. लोकांनी ऑर्डर केलेल्या अनेक वस्तू या सर्वात आधी या दुकांदारांकडे येत असतात आणि त्यानंतर लोकं दुकानदारांकडून आपल्या वस्तु घेत असतात. यामुळे दुकानदारांना अधिक मिळकत मिळण्यास मदत होते, असं जेफ यांनी म्हटलंय. याचबरोबर जो फोटो जेफ यांनी शेअर केलाय, त्यामध्ये जेफ एका किराणा दुकानदाराला एका वस्तूची डिलेव्हरी देताना पाहायला मिळतायत.

ऍमेझॉन चे CEO जेफ यांनी एका किराणामालाच्या दुकानात आपलं ऍमेझॉनवरून बुक केलेलं पार्सल घेण्यास आलेल्या ग्राहकाला स्वतःच्या हातानी त्यांचं पार्सल दिलं. आणि त्याचेच फोटो त्यांनी इंस्टाग्रामवर शेअर केलेत. जेफ बेझोस यांनी २०२५ पर्यंत भारतातील दहा लाख लोकांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणार असल्याचं वचन दिलंय. 

amazon CEO delivers package from kirana store in mumbai photo goes viral

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT