मुंबई

Ambarnath: वालधुनी नदी किनाऱ्यावरील जुने पिंपळाचे वृक्ष कोसळले ! नागरीकांचा संताप

River Development Latest Update: परिसर सुशोभिकरणामुळे वृक्षांना हानी हिराली फाऊंडेशनने दाखल केली तक्रार

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

Waldhuni River : अंबरनाथ शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीच्या किनारी शिवमंदिर परिसर सुशोभिकरणाचे काम सुरु आहे. या कामाच्या ठिकाणी एक जुने भव्य असे पिंपळाचे वृक्ष उन्मळून पडल्याची घटना घडली आहे.

येथे सुरु असलेल्या कामामुळे वृक्षाला धोका निर्माण होऊन ते पडल्याचा आरोप पर्यावरण प्रेमी करत आहेत. याप्रकरणी हिराली फाऊंडेशनच्या सरिता खानचंदानी यांनी संबंधित कंत्राटदाराविरुद्ध शिवाजी नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

दाखल तक्रारीनुसार संबंधित कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबत सरिता यांनी राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाकडे पिटिशियन देखील दाखल केली आहे.

अंबरनाथ शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीच्या किनारी शिवमंदिर परिसर सुशोभिकरण प्रकल्पाचे काम सुरु आहे. चार पाच दिवसांपूर्वी वालधुनी नदीच्या किनारी असलेल्या शिवमंदिराजवळ एक जुने पिंपळाचे वृक्ष उन्मळून पडले. हे वृक्ष पन्नास वर्षांपेक्षा अधिक असल्याचे स्थानिक रहिवासी सांगतात. या झाडाची पुजाही केली जात होती. हे वृक्ष इतके भव्य होते की ते उन्मळून पडल्यानंतर वालधुनी नदीच्या पात्राच्या एका किनाऱ्यापासून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत भाग व्यापला होता. वृक्ष उन्मळून पडल्याचे छायाचित्र समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर अंबरनाथ शहरातील जुने जाणत्यांकडून हळहळ व्यक्त होत होती.

अंबरनाथच्या या नदीकिनारी शिवमंदिर परिसर सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. या कामात सध्या वालधुनी नदी किनारी घाटाची निर्मिती केली जाते आहे. त्यासाठी येथील मोठा भाग सपाट करण्यात आला आहे. मात्र येथे सुरु असलेल्या कामामुळे अनेक झाडे मुळांसकट उपटून टाकण्यात आली आहेत. तसेच या ठिकाणी बांधकाम केल्याने नदीचे नैसर्गिक पात्रास हानी पोहोचत आहे.

या कामामुळेच या वृक्षाची मुळे उखडली गेल्याचा आरोप हिराली फाऊंडेशनच्या अॅड. सरिता खानचंदानी यांनी केला आहे. संबंधित कंत्राटदाराविरुद्ध शिवाजी नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरुन नगरपालिकेमार्फत सुशोभीकरण करणाऱ्या कंत्राटदाराविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५ कलम ८ आणि २१ (१) अंतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे.

याविषयी सरिता यांनी सांगितले की, शिवमंदिर जवळ वालधुनी नदीपात्रात व नदीचा किनारा येथे सिमेंट कॉंक्रीटीकरण करण्यात आले आहे. यासाठी नगरपरिषदेने नदीपात्रातील सुमारे 50 वर्षाहून अधिक जुन्या वृक्षांची तोड केली आहे. याठिकाणी अनधिकृतपणे कॉंक्रीटीकरण करण्यात आल्याची तक्रार सरीता यांनी यापूर्वी पुरातत्व विभाग, पाठबंधारे विभाग, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, जी.एस.डी.ए विभाग पुणे, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, पोलिस आयुक्त ठाणे, अंबरनाथ नगरपरिषदेकडे केली आहे. याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने मानव अधिकार आयोग मुंबई येथे पिटीशियन दाखल केली आहे.

शनिवारी सकाळी जुने पिंपळाचे वृक्ष पडल्याची माहिती मला मिळाली. मी त्याठिकाणी जाऊन पाहणी केली. या ठिकाणी नगर परिषदेमार्फत सुशोभिकरणाचे कंत्राट ज्या कंत्राटदाराला दिले होते त्याने बेपर्वाईने 50 वर्षापेक्षा जुन्या पिंपळाच्या वृक्षाची मुळे यापूर्वी तोडली होती. त्या झाडाच्या सभोवती सिमेंटचा कट्टा बांधल्यामुळे सदर पिंपळाचे झाड पडल्याचे मला दिसले. यामुळे संबंधित कंत्राटदार विरोधात तक्रार दाखल केली आहे. याची सखोल चौकशी व्हावी व जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी माझी मागणी असल्याचे सरीता यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: शुभमन गिलच्या कॅप्टन्सीबद्दल विराट कोहलीने स्पष्टच सांगितलं, 'अजूनही शिकतोय, तो दीर्घकाळ...'

NEET 2026: 'स्लो लर्नर' ते ऑल इंडिया रँक 1; सोडवले 10 हजारांपेक्षा जास्त MCQ! पाहा NEET PG टॉपरची भन्नाट यशोगाथा...

होमस्टेमध्ये २२ वर्षीय निमिषाचा मध्यरात्री मृत्यू, बॉयफ्रेंड आसिफला पोलिसांनी घेतलं ताब्यात

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात खासगी रुग्णालय आणि पॅथॉलॉजीवर कारवाई

Mumbai-Pune Accident: मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर तिहेरी अपघात; कोल्हापुरच्या दोन तरुणांचा मृत्यू, एक गंभीर Video Viral

SCROLL FOR NEXT