Ambulance 108 stop sakal
मुंबई

रायगड : जिल्ह्यातील 108 क्रमांकावरील रुग्णवाहिका थांबणार

पगारवाढ व इतर मागण्या मान्य न झाल्यास पुकारणार कामबंद आंदोलन

अमित गवळे - सकाळ वृत्तसेवा

पाली : नियमित वेतन व कोरोना काळातील बोनस मिळावा आणि पगारवाढ व्हावी या मागण्या पूर्ण होण्यासाठी जिल्ह्यातील 108 क्रमांक रुग्णवाहिका चालकांनी संबधीत विभागांना निवेदन दिले आहे. येत्या २५ मार्चपर्यंत यावर तोडगा न काढल्यास कामबंद आंदोलन करणार असल्याचा इशारा रुग्णवाहिका चालकांनी दिला आहे.

महाराष्ट्र रुग्णवाहिका 108 वाहन चालक संघटनेच्यावतीने बी.व्ही.जी.इंडिया लिमिटेड, जिल्हा व्यवस्थापक रायगड अलिबाग, जिल्हा शल्यचिकित्सक सुहास माने, तसेच रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक रायगड यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. यामध्ये नमूद केले आहे की रायगड जिल्ह्यातील 108 रुग्णवाहिका वाहन चालक (पायलट) सन 2014 पासून बी.व्ही.जी.इंडीया लि. कंपनीमध्ये कंत्राटी रुग्णवाहिका चालक म्हणून कामावर रुजू आहेत. पण 2014 पासून आजपर्यंत आमच्या किमान वेतनात एकही रुपयाची वाढ झालेली नाही. तसेच आम्हाला वेतन कोणत्या स्वरूपात येते याची विचारणा केली असता विचारून सांगतो, उद्या सांगतो, मला माहीत नाही.

अशा प्रकारच्या उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. जर या विषयाची समाधानकारक उत्तर देण्यास समर्थ नसाल तर वेतन खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत आठ दिवसात रायगड जिल्ह्यामध्ये वाहन चालकांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात यावे. जर येत्या आठ दिवसांत बैठकीचे आयोजन करण्यात आले नाही. तर ठीक नवव्या दिवशी रायगड जिल्ह्यातील सर्व 108 वाहन चालक काम बंद आंदोलन करतील आणि या गोष्टीची सर्वस्वी जबाबदारी तुमची असेल असे निवेदनात म्हटले आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये, म्हणून निवेदन देत आहोत. आठ दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास कामबंद आंदोलनाचा पर्याय आमच्यासमोर असल्याचे रुग्णवाहिका चालकांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT