मुंबई

कल्याण-शिळफाट्याची वाहतूककोंडी ब्रम्हदेव तरी सोडवणार का? असंख्य रुग्णवाहिका आणि वाहनचालकांना मनस्ताप

रविंद्र खरात

कल्याण  - भिवंडी कल्याण शिळफाटा रोड वरील रस्त्यात पडलेले खड्डे, धीम्या गतीने सहा पदरी रस्त्याचे काम सुरू असल्याने मागील अनेक दिवसांपासून या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे.  या कोंडीमुळे सर्वसामान्य वाहनचालकांसोबत रुग्णवाहिकां देखील अडकत आहेत. त्यामुळे एखाद्या वेळी आपत्कालिन परिस्थितीत रुग्णवाहिकेलाही मार्ग काढणे कठिण झाले आहे.

भिवंडी-कल्याण शिळफाटा रोड या रस्त्यावर सहा पदरी सिमेंट रस्ता रस्ते विकास महामंडळ मार्फत करण्याचे काम सुरू असून लॉकडाऊन मुळे काम धीम्या गतीने होत आहे .अनेक ठिकाणी अर्धवट रस्ते तर निळजे पूल समस्या, देसाई नाका, पलावा, पत्रिपुल आदी परिसरात भले मोठे रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहतुकीवर परिणाम होत आहे. अनेक ठिकाणी बेशिस्त वाहन चालकामुळेही नाहक कोंडी होत आहे.

आज  (ता13) रोजी शिळफाटा रोड येथे सकाळपासून वाहतूक कोंडी होती. यामुळे अनेक वाहन चालकांनी कल्याण पूर्व मधून वालधुनी पुलावरून वाहन नेण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथे ही वाहनांच्या रांगा लागल्याने कल्याणमध्ये ही वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक कोंडीने वाहन चालक, नागरिक, त्रस्त आहेत. आज अनेक ठिकाणी या कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याचे चित्र दिसून आले.

याबाबत प्रत्यक्षदर्शी निखिल टोकेकर यांनी सांगितले की, रस्त्यात खड्डे, अर्धवट पुलाची आणि रस्त्याची कामे यामुळे वाहतूक कोंडीने आम्ही त्रस्त आहे .अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी असताना अनेक वाहन चालक उलट दिशेने वाहन चालवत होते तर दुसरीकडे रुग्ण वाहिका वाहन चालक सायरन वाजवून ही अन्य वाहन चालक त्यांना पुढे जाण्यास जागा देत नसल्याचे दुर्देवी आहे 

------------------------------------------------------ 

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain News : झाडं रस्त्यावर पडल्यानं बेस्टचा खोळंबा, डझनभर मार्ग बदलले; प्रवाशांचे प्रचंड हाल

Tukaram Mundhe Water Inspection : तुकाराम मुंढेंना आता वेगळं काम; हॉटेलमध्ये मिळणारे जारमधील पाणी तपासणार, एसओपी तयार करण्याचे निर्देश

Marathi Live Updates : वरंधा घाटात पुन्हा दरड कोसळली, भोर-महाड मार्गावरील वाहतूक बंद

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची बातमी समजताच सर्वात आधी कोणाला फोन केला? स्वतःच केला खुलासा

Mumbai Rain: मुंबईत कोसळधार, तरी पाण्याची चिंता कायम! ७ धरणांच्या साठ्यात फक्त ३ टक्के वाढ, आकडेवारी समोर

SCROLL FOR NEXT