मुंबई

कोरोनातही जल्लोषात साजरा केला 'शेहनशहा' बैलाचा वाढदिवस, YouTube ची लिंक पाहून पोलिस आले घरी

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - मोठागावच्या शेहनशहा या बैलाचा वाढदिवस डोंबिवलीत नुकताच धूमधडाक्यात पार पडला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना गर्दी टाळण्याचे आवाहन वारंवार प्रशासनाकडून करण्यात येतंय. मात्र वारंवार आवाहन करूनही शेहनशहाच्या वाढदिवसाला डोंबिवलीतील काही तरुणांनी गर्दी केली होती.

हा शेहनशहा म्हणजे किरण म्हात्रे यांचा बैल असून बेईलच्या वाढदिवसाच्या पार्टीत कोरोना नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात शुक्रवारी आयोजकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे विष्णूनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक संजय साबळे यांनी सांगितले.

डोंबिवली पश्चिमेतील मोठागांव येथे गोवर्धन टॉवरच्या समोर प्रेमाबाई निवास येथे किरण एकनाथ म्हात्रे यांनी त्यांच्या बैलाच्या वाढदिवसाच्या पार्टीचे जंगी आयोजन केले होते. गुरुवारी रात्री घराच्या पाठीमागे आयोजित या पार्टीमध्ये मोठागावचा शेहनशहा असलेल्या या बैलाचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा देखील झाला.

या वाढदिवसाचे युट्युबवर चक्क लाईव्ह स्ट्रिमिंग ठेवण्यात आले होते. कार्यक्रमावेळी आयोजित नाच गाण्याच्या कार्यक्रमात वाढदिवसाला जमलेल्या मंडळींनी कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडविल्याचे दिसून आले. या वाढदिवसाची युट्यूब लिंक सर्वत्र व्हायरल होत होती आणि त्याविषयी शहरात चर्चा देखील रंगल्या.

याची माहिती विष्णूनगर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनेचा तपास केला. कार्यक्रमाची कोणतीही परवानगी न घेता तसेच कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयोजक म्हात्रे याच्याविरोधात शुक्रवारी विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर सोहळे, कार्यक्रमांना गर्दी करु नका असे पालिका प्रशासन, पोलिस यंत्रणा वारंवार आवाहन करीत असूनसुद्धा शहरात असे कार्यक्रम होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

amid corona kiran mhatre celebrated birthday of their bull without following rules case registered

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्याचे भाव वाढले; चांदीही चमकली! जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव!

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस, दोन उपमुख्यमंत्री, अर्धा डझन मंत्री... नाशिक दौऱ्यावर 'मंत्रिमंडळाची' फौज!

Recharge Plan : फक्त 7 रुपयांत 2GB डेटासह अनलिमिटेड कॉल; 50 दिवस वैधता, 'या' बड्या कंपनीने दिलं सरप्राइज, Jio-Airtel ला मोठा धक्का

Latest Marathi Breaking News Live : नागपुरात एबीव्हीपीचा विद्यापीठाविरोधात धडक मोर्चा, विद्यापीठ परिसरात शेकडो विद्यार्थी आले एकत्र

'कोणालाच जास्त काळ सहन करायला नको' काजोलचं लग्नाबाबच वक्तव्य चर्चेत, म्हणाली...'लग्नाला एक्सपायरी डेट हवी'

SCROLL FOR NEXT