मुंबई : रंगकर्मीच्या (theater artist) विविध मागण्या (demands) सरकार लवकरात लवकर पूर्ण (government) करण्याचा नक्कीच प्रयत्न करील, असे आश्वासन सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख (amit deshmukh) यांनी आज दिले. राज्यभरातील रंगकर्मींनी विविध ठिकाणी काल जोरदार (strike) आंदोलन केले. जवळपास एक हजारहून अधिक रंगकर्मी सरकारविरोधात रस्त्यावर उतरले होते. रंगकर्मींच्या या तीव्र आंदोलनाची सरकारने दखल घेतली आहे.
आज रंगकर्मींच्या एका शिष्टमंडळाने सांस्कृतिक मंत्र्यांची भेट घेतली. या शिष्टमंडळामध्ये अभिनेते विजय पाटकर, दिग्दर्शक विजय राणे, अभिनेत्री व नृत्यांगणा मेघा घाडगे, अभिनेता संचित यादव, दिग्दर्शक चंद्रशेखर सांडवे, अभिनेत्री शीतल माने, वाद्यवृंद प्रतिनिधी सुभाष जाधव, अभिनेता उमेश ठाकूर, नृत्यांगणा अमिता कदम आदी मंडळींचा सहभाग होता.
सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत रंगकर्मींच्या शिष्टमंडळाने कोरोना काळातील आणि कायम स्वरूपातील अशा दोन प्रकारातील विविध मागण्या मंत्रीमहोदयांसमोर ठेवल्या. कोरोनामुळे फी न भरता आल्यामुळे रंगकर्मींच्या मुलांना शाळेतून काढून टाकण्यात आले आहे. तात्काळ संबंधित शिक्षण संस्थांशी बोलून हा प्रश्न निकाली काढावा. गेल्या दीड वर्षात काम नसल्याने कमाई झालेली नाही.
त्यामुळे घरभाडे आणि इलेक्ट्रीसिटी बिल भरण्यास अडचण होत आहे. आपल्या अखत्यारीत असलेल्या संबंधित आस्थापनांना आपण आदेश देऊन रंगकर्मींना सवलत मिळवून द्यावी अशा काही मागण्या कोरोना महामारीतील ठेवण्यात आल्या. तसेच महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विखुरलेल्या रंगकर्मींची शासन दरबारी नोंद व्हावी, कलाकार पेन्शन योजनेसाठी लाभार्थींच्या मर्यादा संख्येत वाढ करावी. या योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेल्या अटींमध्ये शिथिलता आणावी. तसेच मानधनाच्या आकड्यात वाढ करावी, मानधनाचा लाभ घेण्यासाठी लागणाऱ्या उत्पन्नाच्या दाखल्याच्या अटीमधे बदल करावा अशा काही मागण्या कायम स्वरूपातील होत्या. या सगळ्या मागण्यांचा सरकार लवकरच पूर्तता करील असे आश्वासन सांस्कृतिक मंत्र्यांनी दिले.
एक सप्टेंबरपासून नाट्यगृह व चित्रपटगृह सुरू होणार
वासुदेव, पिंगोळा, पोतराज, नंदीबैल इत्यादी मंडळींना आपली कला सादर करण्यासाठी सोसायटी वा अन्य मोकळ्या जागेत परवानगी द्यावी अशी मागणी रंगकर्मींनी करताच सांस्कृतिक मंत्र्यांनी या मागणीसाठी मदत व पुनर्वसन मंत्री मा. विजय वड्डेटिवार यांच्याकडे तात्काळ बैठक लावली. ज्या जिल्ह्यामध्ये शिथिलता आहे त्या जिल्ह्यामध्ये गर्दी न करता या कला सादर करण्यासाठी मुभा देण्याची तयारी मंत्री विजय वड्डेट्टीवार दर्शविली. तसेच 1 सप्टेंबरपासून राज्यातील चित्रपटगृहे व नाट्यगृहे सुरू होतील, असे आश्वासनही मंत्री विजय वड्डेटीवार यांनी शिष्टमंडळाला दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.