मुंबई

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेवर काय म्हणाल्या 'मिसेस मुख्यमंत्री'?

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्रात लवकरात लवकर सत्ता स्थापन व्हायला हवी. राजकीय नेत्यांना सद्बुद्धी येवो आणि आपण कुठे आहोत ते लक्षात घेऊन राजकीय नेत्यांनी सर्वसमावेशक निर्णय घ्यायला हवा असं मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांनी म्हटलंय. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमृता फडणवीस यांनी आपलं मत मांडलं आहे. मुंबईतील गोरेगावमध्ये 'कोकण प्रांत' नावाचं अस्सल कोकणी खाद्य पदार्थांचं रेस्टॉरंटच्या उद्घाटनाला अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली होती, त्यावेळी अमृता फडणवीस यांनी मुलाखत दिली.   

विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळूनही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत सत्तेचा वाटा अधिक मिळविण्यासाठी रस्सीखेच सुरू राहिली. परिणामी निवडणुकीचा निकाल लागून आज आठवडा उलटला, तरीही महाराष्ट्रात सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. एकीकडे अवकाळी पावसाने उद्‌ध्वस्त झालेला शेतकरी सावरण्याचे आव्हान उभे असताना, बहुमत मिळालेली युती सत्तेच्या वाट्यासाठी भांडत असल्याचे चित्र महाराष्ट्रात उभे राहिले आहे. हा पोरखेळ थांबवावा, अशी भावना महाराष्ट्रातून व्यक्त होत आहे. या भावनेचे प्रतिबिंब सोशल मीडियातही उमटले आहे. 

शपथविधीची तयारी सुरू

देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा मंगळवारी (ता. ५) शपथविधी होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी वानखेडे स्टेडियमवर सोहळ्याची तयारी सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, आमदार प्रसाद लाड व कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्याकडे या सोहळ्याची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे समजते. मंत्रालयातील राजशिष्टाचार विभागालादेखील तयार राहण्याच्या सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपाल भाजपला सत्तास्थापनेची सर्वप्रथम संधी देतील, हे निर्विवाद असल्याने भाजपने फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी करण्याची तयारी सुरू केली. भाजपचे किमान नऊ मंत्री शपथ घेतील, असा दावा करण्यात येत असून, यामध्ये पंकजा मुंडे यांचाही समावेश होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, नवीन विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर राज्यपाल भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी जास्तीत जास्त आठ ते दहा दिवसांची मुदत देतील. या कालावधीत शिवसेनेची मनधरणी करण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न होतील, असे सूत्रांचे मत आहे.

Webtitle : amruta fadanavis on maharashtra government formation crisis  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT