anand paranjpe criticize jitendra awhad over ncp party name and symbol ec decision Sakal
मुंबई

Thane News : नादमध्ये बसून आमचा नाद करु नका; प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांचा आव्हाडांना इशारा

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव व घड्याळ या चिन्हाला अधिकृत मान्यता दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Thane News : निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव व घड्याळ या चिन्हाला अधिकृत मान्यता दिली आहे.

त्यामुळे आता नाद मध्ये बसलेल्यांनी आमचा नाद करु नका, असा इशारा राष्ट्रवादी प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांचे नाव न घेता दिला. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव व घड्याळ हे चिन्ह देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षच अधिकृत असल्याचा निर्णय दिला आहे.

निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचे ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी,मध्यवर्ती कार्यालयसमोर ढोलताशे वाजवून, फटाके फोडून, झेंडे फडकावित, नाचत गात, एकच वादा, अजितदादा अशा घोषणा देत जल्लोषात आपला आनंद साजरा केला,

या देशातील संविधानाचा आता विरोधकांनी सन्मान ठेवत, निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे मनमोकळेपणाने स्वागत करावे, आता नाद मध्ये बसून आमचा नाद करु नका, असा इशारा प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

CJI Surya Kant: ''..तर राजीनामा द्या!'' काँग्रेसची सरन्यायाधीशांवर पोस्ट, गदारोळ होताच पोस्ट डिलीट

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT