Uddhav Thackeray_Anand Shinde 
मुंबई

Dasara Melava: आनंद शिंदेंच्या सूरांनी दणाणणार ठाकरेंचा मेळावा; येणार नवं गाणं

या गाण्यातून शिंदे गटावरही भाष्य करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा महत्वाचा आहे. त्यामुळं याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा दरसालप्रमाणं शिवाजीपार्कवरच होणार आहे. याची वातावरण निर्मिती करण्यासाठी आता एक नवं गाण लवकरच लॉन्च होणार आहे. विशेष म्हणजे प्रसिद्ध पार्श्वगायक आनंद शिंदे हे गाण गाणार आहेत. या गाण्यातून शिंदे गटाला लक्ष्य करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. (Anand Shinde Song will play at Uddhav Thackeray Dussehra Melava launched soon)

यासंदर्भात नुकतीच उद्धव ठाकरे आणि आनंद शिंदे यांच्यामध्ये भेट झाली. या भेटीत आनंद शिंदे यांच्या गाण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे. या भेटीबाबत आनंद शिंदे म्हणाले, "उद्धव ठाकरेंनी मला एक गाण करण्यासाठी बोलावलं होतं. कलाकारांना जात-धर्म नसतो त्यामुळं मी कोणाचंही गाणं गाऊ शकतो. त्याचमुळं मी त्यांच्याकडे गेलो होते. लवकरच हे गाण सोशल मीडियावर प्रसिद्ध केलं जाणार आहे"

राष्ट्रवादी कधीच सोडणार नाही - आनंद शिंदे

मी राष्ट्रवादी काँग्रेस कधीच सोडू शकत नाही. जिथं बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे आणि त्यांना माणनारे लोक जोपर्यंत राष्ट्रवादीत आहेत तोपर्यंत आनंद शिंदे पवार कुटुंबियांसोबत असणार आहे. शिवसेनेसाठी मी गाणं गाणार असल्याचं शरद पवारांच्या कानावर टाकलं. यावर त्यांनी मला सांगितलं की, गाण्याबाबत तुम्हाला माझ्या परवानगीची गरज नाही. पण त्यांच्या कानावर हे टाकण्याचं माझं कर्तव्य मी केलं आहे, असंही आनंद शिंदे यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT