Anand Teltumbde released from Taloja Jail charges of Naxalism mumbai esaka
मुंबई

Anand Teltumbde: आनंद तेलतुंबडे यांची तळोजा कारागृहातून सुटका

शहरी नक्षलवादाच्या आरोपातून गेल्या अडीच वर्षांपासून तळोजा कारागृहात बंदिस्त

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : शहरी नक्षलवादाच्या आरोपातून गेल्या अडीच वर्षांपासून तळोजा कारागृहात बंदिस्त असलेले प्रा. आनंद तेलतुंबडे यांची शनिवारी दुपारी सुटका झाली. तुरुंगातून बाहेर आल्याचा आनंद झाल्याचे सांगत खोट्या गुह्यात तब्बल ३१ महिने कारागृहात डांबून ठेवल्याचे दु:ख असल्याचे त्यांनी सांगितले.

शहरी नक्षलवादाच्या आरोपावरून एप्रिल २०२० मध्ये प्रा. तेलतुंबडे यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते तळोजा कारागृहात होते. तेलतुंबडे यांचा भाऊ मिलिंद हा नक्षलवादी होता. मात्र आनंद तेलतुंबडे यांचा बेकायदा कारवायांत सकृतदर्शनी सहभाग स्पष्ट होत नसल्याचे स्पष्ट करत उच्च न्यायालयाचे न्या. अजय गडकरी आणि न्या. मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने जामीन मंजूर केला होता.

राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए)ने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने काल उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवला होता. तेलतुंबडे यांच्या वकिलांनी मुंबईतील विशेष ‘एनआयए’ न्यायालयात जाऊन त्यांच्या कारागृहातील सुटकेचा आदेश काढावा, अशी मागणी केली.

तसेच तेलतुंबडे यांच्या जामिनाची हमी म्हणून रोख एक लाख रुपये न्यायालयात जमा केले होते. विशेष न्यायालयाने वकिलांची मागणी मान्य करून त्यांची तळोजा कारागृहातून सुटका करण्याचा आदेश काल काढले. तळोजा कारागृह प्रशासनाकडे हा आदेश आज सादर केल्यानंतर आवश्यक त्या कायदेशीर प्रक्रियेनंतर प्रा. तेलतुंबडे यांची सुटका करण्यात आली.

कुटुंबीयांकडून स्वागत

तेलतुंबडे हे अडीच वर्षानंतर कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी तळोजा कारागृहाबाहेर स्वागत केले. या वेळी आमदार कपिल पाटील देखील उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi on Rahul Gandhi : 'विरोधी पक्षात असे काही नेते आहेत, जे राहुल गांधींपेक्षा चांगले बोलतात, परंतु...’’

Pune University Flyover : गणेशखिंड रस्त्यावरील उड्डाणपूल सुरू; वाहनचालकांना कोंडीपासून काहीसा दिलासा

Mumbai News : रोषणाईपासून बससेवेपर्यंत… गणेशोत्सवासाठी बेस्टची फुल तयारी

Crime News : नागा साधूच्या वेशात फसवणूक; नाशिकमध्ये संमोहन करून अंगठी व रोकड लंपास

Dhanorkar Join BJP: रविंद्र चव्हाणांचा विराट शो! धानोरकरांचा भाजपात प्रवेश, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचा किल्ला कोसळला

SCROLL FOR NEXT