अनन्या पांडे  
मुंबई

मस्करी पडली महागात, चॅटवरुन अनन्याचं NCBला अजब उत्तर

या चॅटमध्ये एका टप्प्यावर आर्यन अनन्याबरोबर गांजा बद्दल बोलू लागला.

सुरज सावंत

मुंबई: ड्रग्ज प्रकरणात (drug case) आता अभिनेत्री अनन्या पांडेचीही (Ananya Panday) चौकशी सुरु झाली आहे. काल एनसीबीने (Ncb) अनन्याच्या वांद्रे येथील घरावर छापा मारला व दुपारी एनसीबीने तिला कार्यालयात बोलावले होते. आर्यन खान (Aryan khan) सोबत केलेल्या चॅटिंगवरुन काल नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अभिनेत्री अनन्या पांडेची चौकशी केली. आर्यन आणि अनन्याचे चॅट मेसेजेस एनसीबीला मिळाले. त्यात ते गांजा खरेदीबद्दल बोलत होते.

या चॅटमध्ये एका टप्प्यावर आर्यन अनन्याबरोबर गांजा बद्दल बोलू लागला. काही जुगाड करुन गांजाची व्यवस्था होऊ शकते का? असे आर्यन अनन्याला विचारतो. त्यावर अनन्याने मी अरेंज करते, असे उत्तर दिले.

गुरुवारी चौकशीच्यावेळी जेव्हा एनसीबीने अनन्याला हे चॅट दाखवले. त्यावेळी तिने 'मी मस्करी करत होते' असे उत्तर दिले. आजही अनन्याला चौकशीसाठी एनसीबीने बोलावले आहे. या चॅटिंगच्या व्यतिरिक्त दोघांमध्ये आणखीही संवाद झालेत. या चॅटिंगला पडताळण्यासाठीच सध्या एनसीबीकडून अनन्या पांडेची चौकशी सुरू आहे.

अनन्या पांडे प्रसिद्ध अभिनेते चंकी पांडे यांची मुलगी आहे. ९० च्या दशकात अनेक सिनेमांमध्ये चंकी पांडे यांनी प्रमुख भूमिका बजावली होती. एनसीबीच्या या कारवाईमुळे बॉलिवूडमधली आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT