मुंबई

समीर वानखेडे यांच्या केबिनबाहेर बसून होते चंकी पांडे

आतमध्ये मुलगी अनन्याची NCB कडून कसून चौकशी सुरु होती.

दीनानाथ परब

मुंबई: आर्यन खानच्या (aryan khan) अटकेमुळे ड्रग्ज प्रकरणात (drug case) अनन्या पांडेही (ananya panday) अडचणीत आली आहे. आर्यनने एका अभिनेत्री बरोबर ड्रग्ज संबंधी चॅट केल्याची चर्चा होती. काल NCB ने वांद्रयातील घरी छापा मारल्यानंतर ती अभिनेत्री अनन्या पांडे असल्याचे स्पष्ट झाले. अनन्या प्रसिद्ध अभिनेते चंकी पांडे यांची मुलगी आहे. चंकी पांडे यांनी ९० च्या दशकात बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

मुख्य नायक, मित्र, भाऊ अशा विविध भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. त्यामुळे चंकी पांडे हा चित्रपट रसिकांसाठी ओळखीचा चेहरा आहे. काल एनसीबीने वांद्रयातील पांडे यांच्या घरी छापा मारला. त्यानंतर दुपारी मुंबईतील कार्यालयात अनन्याची चौकशी केली. आज सुद्धा अनन्याची एनसीबीकडून चार तास कसून चौकशी करण्यात आली.

ड्रग्ज प्रकरणात मुलीचे नाव आल्यामुळे चंकी पांडे सुद्धा अस्वस्थ आहे. आर्यन बरोबरचा अनन्याचा चॅट एनसीबीकडे आहे. अनन्याची आतमध्ये एनसीबीकडून कसून चौकशी सुरु असताना चंकी पांडे हे समीर वानखेडे यांच्या कार्यालयाबाहेर बसून होते. अभिनेता अरमान कोहलीचा मित्र बाबूभाई कांचवाला यांनी ही माहिती दिली. तपास अधिकारी व्ही.व्ही.सिंह आणि महिला अधिकारी यांच्या उपस्थितीत समीर वानखेडे यांनी अनन्याला काही प्रश्न विचारले. ड्रग्ज प्रकरणात बाबूभाई काचवाला यांना शुक्रवारी एनसीबीने समन्स बजावले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT