Maharastra State Co-Op Bank
Maharastra State Co-Op Bank sakal
मुंबई

Maharastra State Co-Op Bank : महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेला सहाशे कोटींचा निव्वळ नफा ; विद्याधर अनास्कर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला ६०९ कोटी रुपये निव्वळ नफा झाला असून बँकेचे नक्तमूल्य (नेटवर्थ) ३,८१७ कोटी रुपये झाले आहे. देशातील सर्वात जास्त नक्तमुल्य असलेली ती एकमेव सहकारी बँक ठरली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत त्यात ५९० कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

बँकेला या आर्थिक वर्षात ६०९ कोटी रुपये निव्वळ नफा झाला असून यात शासनाकडून थकहमीपोटी मिळालेल्या कोणत्याही रकमेचा समावेश नाही, अशी माहिती बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली. मागीलवर्षीच्या नफ्याची रक्कम ६०३ कोटी रुपये होती व त्यात शासनाने दिलेल्या थकहमीच्या रकमेचा समावेश होता.

बँकेची वैधानिक गंगाजळी व भागभांडवल मिळून बँकेचा स्वनिधी रु. ६,५६४ कोटी झाला असून, त्यामध्ये गतवर्षीच्या तुलनेत ५३८ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण (सी.आर.ए.आर.) रिझर्व्ह बँकेच्या निकषापेक्षा पुष्कळ जास्त म्हणजे १७.७६ एवढे आहे.

वर्षअखेर राज्य बँकेने दिलेली कर्जे २६,४५० कोटी रुपये असून त्यात गतवर्षीपेक्षा ४९० कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. परंतु व्यावहारिक निर्णय घेत बँकेने रु. २,४५३ कोटी रुपयांची घट केली असून आता या ठेवी १८,६१४ कोटी रुपयांच्या आहेत. वर्षअखेर बँकेचा एकूण व्यवहार ४५,०६४ कोटी रुपये इतका झाला आहे.

गेल्या पाच वर्षांत बँकेच्या प्रती सेवक व्यवसायात दुप्पटीने वाढ होवून तो ३३ कोटी रुपयांवरुन ६४ कोटीपर्यंत गेला आहे. तर अनुत्पादक कर्जाचे निव्वळ प्रमाण (नेट एन.पी.ए.) ०.४५ टक्के इतके कमी झाले आहे. बँकेस गेली दहा वर्ष लेखापरीक्षणामध्ये सतत `अ' ऑडिट वर्ग मिळत आहे. मागील आठ वर्षांपासून बँक सभासदांना दहा टक्के इतका लाभांश देत आहे, असेही अनास्कर यांनी सांगितले.

बँकेने आपले व्यवहार नागरी सहकारी बँका, पतसंस्था, औद्योगिक क्षेत्रात विस्तारले तसेच महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाद्वारे शेतकऱ्यांना थेट कर्जपुरवठा करण्यासाठी आखलेल्या योजनेमुळे बँकेच्या व्यवसायात मोठी वाढ झाली. बँकेने राज्यातील नागरी सहकारी बँकांना सरकारी कर्जरोख्यांची खरेदी-विक्री करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उपलब्ध करुन दिली आहे.

सहकारी बँकिंग क्षेत्रासाठी बँकेने `सायबर ऑपरेशन सेंटर' उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य बँकेस विदेश विनिमय व्यवहारासाठी रिझर्व्ह बँकेने अधिकृत परवाना दिला असून राज्य बँक आपल्या ग्राहकांना व अनेक नागरी सहकारी बँकांना व त्यांच्या ग्राहकांना एक्सपोर्ट व इंपोर्ट क्रेडिट लिमिट देत असून त्यांचे व्यवहार समर्थपणे हाताळत आहे.

राज्य बँकेच्या प्रगतीचे प्रमुख निकष (३१ मार्च २०२३ अखेर) :

एकूण बॅंकिंग व्यवहार ४५ हजार ६४ कोटी रुपये

देशात सर्वाधिक तीन हजार ८१७ कोटी नेटवर्थ असलेली सहकारी बँक

अनुत्पादक कर्जाचे निव्वळ प्रमाण (नेट एनपीए) ०.४५ टक्के

लेखापरीक्षणात १० वर्षांपासून सतत ‘अ’ ऑडिट वर्ग

मागील आठ वर्षांपासून सभासदांना १० टक्के लाभांश

बँकेस सुरक्षेचे आयएसओ प्रमाणपत्र

‘सायबर ऑपरेशन सेंटर’

सहकारी बँकिंग क्षेत्रासाठी बँकेने ‘सायबर ऑपरेशन सेंटर’ उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे काम प्रगतिपथावर आहे. राज्य बँकेला विदेश विनिमय व्यवहारासाठी रिझर्व्ह बँकेचा परवाना आहे. फॉरेक्स व्यवहार राज्य बँक समर्थपणे हाताळत आहे. नागरी बँकांसाठी सरकारी कर्जरोख्यांची खरेदी-विक्रीसाठी स्वतंत्र प्लॅटफॉर्म उपलब्ध केला आहे.

राज्य बँकेने रिझर्व्ह बँकेच्या सर्व आर्थिक निकषांचे पालन केले आहे. बँकेने आपले व्यवहार जिल्हा बँका, साखर कारखान्यांपर्यंत मर्यादित न ठेवता नागरी बँका, पतसंस्था, औद्योगिक क्षेत्र आणि राज्य वखार महामंडळाद्वारे शेतकऱ्यांना थेट कर्जपुरवठा करण्यासाठी योजना आखल्या आहेत. त्यामुळे बँकेच्या व्यवसायात कमालीची वृद्धी झाली आहे.

- विद्याधर अनास्कर, प्रशासक, राज्य सहकारी बॅंक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : शरद पवार अन् उद्धव ठाकरेंना बघण्यासाठी इचलकरंजीत चेंगराचेंगरी

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

Raigad News : महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरी रायगड मध्ये हरणार आहेत अनंत गीते - रामदास आठवले

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: ऋतुराजची एकाकी अर्धशतकी लढाई, चेन्नईचं पंजाबसमोर विजयासाठी 163 धावांचे लक्ष्य

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

SCROLL FOR NEXT