Mumbai Sakal
मुंबई

ठाणे कारागृह स्वातंत्र्यचळवळीच्या इतिहासाचा जागर

प्राचीन आणि ऐतिहासिक स्थळे म्हणजे या ठाणे शहराचे मानबिंदूच आहेत.

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : प्राचीन आणि ऐतिहासिक स्थळे म्हणजे या ठाणे (Thane) शहराचे मानबिंदूच आहेत. त्यापैकीच एक वास्तू म्हणजे ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृह. पोर्तुगीजांनी १७३० मध्ये हा किल्ला बांधायला सुरुवात (Start)केली. १७३७ च्या मार्च महिन्यात मराठी (Marathi) सैन्याने ठाणे (Thane) जिंकून किल्ल्याचे अपुरे राहिलेले काम पूर्ण केले. ठाणे खाडीच्या किनाऱ्यावर पाच भक्कम बुरुजांचा हा किल्ला १७७४ मध्ये ब्रिटिशांच्या (British) ताब्यात गेला.

१८१६ मध्ये पेशवाईचे कारभारी त्र्यंबकजी डेंगळे यांना याच किल्ल्यात बंदिवान ठेवण्यात आले. ते बहुधा या किल्ल्यातील पहिले कैदी म्हणता येतील. पुढे मात्र ब्रिटिशांनी या किल्ल्यातील अंतर्गत रचना बदलून सन १८३३ मध्ये याचे रूपांतर पूर्णपणे कारागृहात केले. हे कारागृह शेकडो स्वातंत्र्यसेनानींचे बंदीगृह ठरले. ठाणे कारागृहातील वास्तू, येथील भक्कम तटबंदी, बुरुज, वधस्तंभ स्वांतत्र्य

चळवळीतील त्या महान क्रांतिकारी, सेनानींच्या बलिदानाची साक्ष देत आहेत. राघोजी भिंगरेंपासून ते अनंत कान्हेरे, अण्णा कर्वे, विनायक देशपांडे या क्रांतिकारांना ठाण्याच्या तुरुंगात इंग्रजांनी फाशी दिली. बाळासाहेब खेर, एस. एम. जोशी, केशव गोरे, माधव लिमये, द. म. सुतार, नाथा ताम्हाणे यांनी या तुरुंगात कारावास भोगला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kapil Sibal on Supreme Court: सर्वोच्च न्यायालयावरच प्रश्नचिन्ह! कपिल सिब्बल स्पष्टच बोलले; "आता कोर्टात जाण्यात अर्थ नाही, विश्वास उडाला!"

Maharashtra Live News : अभिजीत दिपकेंच्या आजीचे अंत्यसंस्कार थांबवले; आईंचा दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप

YCM Hospital Incident : धक्कादायक ! पिंपरी-चिंचवडमध्ये धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण रस्त्यावर पडला; वायसीएम रुग्णालयातील प्रकार, VIDEO VIRAL

Navratri Festival : आदिमायेच्या उत्सवाला प्रारंभ;घटस्थापनेसाठी दुपारी दीड वाजेपर्यंत मुहूर्त

Tuljabhavani Temple: तुळजापूरला नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण ;तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आज घटस्थापना

SCROLL FOR NEXT