BMC sakal media
मुंबई

अंधेरी-घाटकोपर रस्त्यासाठी सल्लागार; भौगोलिक सर्वेक्षणानंतर उपाययोजना

समीर सुर्वे

मुंबई : अंधेरी घाटकोपर (andheri-ghatkopar) जोड रस्त्याची दुरुस्ती (road repairing) सुरु असताना रस्त्याला तडे जात आहे. त्यामुळे आता महानगरपालिका (bmc) विरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेच्या (VJTI) तज्ञांची (experts) मदत करणार आहे. हे तज्ञ भौगोलिक सर्वेक्षण (geographical survey) करुन उपाय सुचवणार आहे. घाटकोपर अंधेरी जोड रस्ता हा पुर्व आणि पश्‍चिम उपनगरांना जोडणारा प्रमुख रस्ता आहे. तसेच या परीसरात औद्योगिक वसाहत असल्याने नेहमीच वाहानांची वर्दळ (traffic) असते. तसेच, याच मार्गावरुन मेट्रो (metro) धावत आहे.

मुंबईतील महत्वाचा रस्ता असल्याने त्यावरील वाहतुक बंद न करता महानगर पालिका या रस्त्याची दुरुस्ती करत होती.अस्तीत्वात असलेल्या रस्त्यावरच सिमेंट कॉक्रिकटचा रस्ता बनवला जात असून 2016 पासून काम सुरु करण्यात आले.आता पर्यंत ते 99 काम टक्के पुर्ण झाले आहे.मात्र,या नव्या रस्त्याला अंधेरी पुर्वेकडील भागात काही ठिकाणी तडे गेले असल्याचे आढळले आहे.

यावर उपाय म्हणून महानगर पालिकेने व्हीजेटीआय संस्थेच्या तज्ञांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.हे तज्ञ तडे गेलेल्या भागाचे भौगोलीक सर्वेक्षण करुन त्यावर उपाय सुचविणार आहे.या सल्ल्यासाठी दहा लाख रुपयांचे शुल्क देण्यात येणार आहे.तसा प्रस्ताव बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे.व्हीजेटीआय संस्थेचे प्रो.डॉ.अभय बंबोले यांनी पालिकेच्या अभियंत्यां समवेत प्रत्यक्ष पाहाणीही केली आहे.असे या प्रस्तावात नमुद करण्यात आले आहे.

महत्वाचा रस्ता

-अंधेरी पासून घाटकोपर पर्यंत थेट प्रवास

-पवई,कुर्ला येथे जाण्यास मार्ग

-एमआयडीसी या औद्योगिक वसाहती तसेच मरोळ परीसरातील औद्योगिक वसाहतींसाठी महत्वाचा मार्ग

- 4.32 किलोमिटर लांब

- 45.46 मिटर रुंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who was Sandu Karhale? : मराठवाडा मुक्ती संग्रामातील धगधगता तारा हरपला! ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक सांडू कऱ्हाळे यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन, निल्लोडवर शोककळा

Gold Silver Price : सोने-चांदी झाले स्वस्त; एका दिवसात सोने ५ हजारने तर चांदी ४ हजार ९०० रुपयांनी घसरली

Latest Marathi News Update : मुंबईतील ताज हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Fatty Liver: भारतात झपाट्याने वाढतोय फॅटी लिव्हरचा धोका! अशी ओळखा लक्षणे...

What Action Will Tukaram Mundhe Take? बनावट दूध पावडरचे मोठे रॅकेट अन् अधिकाऱ्यांचे हात गुंतल्याचा संशय; सिन्नरमधील 'त्या' घोटाळ्याची मुंढेकडे लेखी तक्रार, काय कारवाई होणार?

SCROLL FOR NEXT