Gokhale Bridge Andheri Sakal
मुंबई

Andheri Gokhel Bridge : अंधेरीच्या गोखले ब्रीजसाठी पालिकेकडून वर्क ऑर्डर आठवड्यातच

अंधेरीच्या गोखले ब्रीजच्या ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटीच्या कामाचे कंत्राट हे ए बी इन्फ्राबिल्ड या कंपनीला मिळाले.

सकाळ वृत्तसेवा

अंधेरीच्या गोखले ब्रीजच्या ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटीच्या कामाचे कंत्राट हे ए बी इन्फ्राबिल्ड या कंपनीला मिळाले.

मुंबई - अंधेरीच्या गोखले ब्रीजच्या ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटीच्या कामाचे कंत्राट हे ए बी इन्फ्राबिल्ड या कंपनीला मिळाले. परंतु काम सुरू करण्यासाठी अद्यापही कार्यादेश देण्यात आलेले नाहीत. गोखले ब्रीजच्या पालिकेच्या अखत्यारीतील कामासाठीचे कार्यादेश येत्या आठवड्याभरात अपेक्षित आहेत. रेल्वेकडूनही ब्रीज तोडण्यासाठीच्या निविदेची प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार रेल्वेही कंत्राटदार निश्चित करण्याच्या मार्गावर आहे.

गोखले ब्रीजचा रेल्वेच्या अखत्यारीतील भाग हा पश्चिम रेल्वेला तोडून देण्याची जबाबदारी आहे. त्यासाठी जानेवारीत काम सुरू होईल असे अपेक्षित आहे. परंतु या सर्व कामासाठी पश्चिम रेल्वेला ब्लॉकही घ्यावे लागतील. रेल्वेच्या कामानंतर पालिकेचे काम प्रत्यक्षात सुरू होणार आहे. आणखी आठवड्याभरात आम्ही गोखले ब्रीजच्या कामासाठी वर्क ऑर्डर देऊ अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी दिली. या कामामध्ये प्री फॕब्रिकेशनचे काम तसेच रेल्वेच्या कामानंतर त्याठिकाणी कास्टिंगसह गर्डर लॉंच करणे हे पालिकेचे मुख्य काम असणर आहे. या कामासाठी पालिकेने ८७ कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू केली होती.

पश्चिम रेल्वेच्या अखत्यारीतील ९० मीटरच्या ब्रीजच्या तोडकामाला काही कंपन्यांनी निविदा दाखल केल्या आहेत. रेल्वेने या कामासाठी १७ कोटी रुपयांची तरतुद केली होती. या कामासाठी एका कंपनीने ११ कोटी तर दुसर्‍ कंपनीने १२ कोटी रुपयांची बोली लावली आहे. पालिकेने पश्चिम रेल्वेकडे या रकमेचा भरणा याआधीच केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

Latest Marathi News Live Update: कात्रज-कोंढवा परिसरात मुसळधार पावसाची हजेरी

मृदंगाचार्य लघाणे महाराजांच्या पत्नीनं संपवलं आयुष्य; वर्षभरापूर्वी लग्न, पतीवर अनैतिक संबंधाचे आरोप

IPL 2026 : RCB च्या गोलंदाजाने क्रिकेट बोर्डाला न्यायालयात खेचले, ९ एप्रिलला निकाल; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Rawdogging Boredom: 'काहीही न करता बसणं' बनलं ट्रेंड! Gen Z चा "Rawdogging Boredom" फंडा आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT