extortion crime esakal
मुंबई

Extortion Crime : एकतर्फी प्रेमातून धडा शिकवण्याचा प्रयत्न! व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवून २३ लाखाची खंडणी केली वसुल

मित्रासोबतचा अश्‍लील व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी वसुल करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

राजू परुळेकर

अंधेरी - मित्रासोबतचा अश्‍लील व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देऊन अंधेरीत राहणाऱ्या एका ज्युनिअर आर्टिस्ट तरुणीकडून तब्बल २३ लाख रुपयांची खंडणी वसुल करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या टिमोती जॉन फर्नाडिस या कथित प्रियकराला आंबोली पोलिसांनी अटक केली.

एकतर्फी प्रेमातून तरुणीला धडा शिकवणार्‍यासाठी त्याने तिचे फोटोसह व्हिडीओ तिच्या नातेवाईकांना पाठवून तिची बदनामी केल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. २६ वर्षाची ही तरुणी ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम करत असून बॉलीवूडमध्ये काम करण्यासाठी तिचे प्रयत्न सुरु आहे.

या दरम्यान तिची टिमोतीशी ओळख झाली होती. ओळखीनंतर या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. पिडीत तरुणींचा मॅनेजर म्हणून काम करण्याची इच्छा आरोपीने व्यक्त केली.

या दरम्यान पिडीतेच्या सोशल मिडीया अकाऊंटचे ऍक्सेस आरोपीने मिळवले. तिच्या नावाने एक बोगस इंटाग्राम अकाऊंट उघडले. पिडीतेचा मित्र असलेल्या शाहिदसोबत किसिंगचा अश्‍लील व्हिडीओ तिच्या नातेवाईकांना पाठवला. तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. बदनामीच्या भीतीने पिडीतेने आरोपीला २३ लाख रुपये दिले होते. त्यापैकी तिने अठरा लाख कॅश तर पाच लाख रुपये ऑनलाईन ट्रान्स्फर केले होते.

आरोपीने शाहिद सोबतचे संबध तोडून टाकण्यासाठी पिडितेचा मानसिक छळ सुरु केला. मात्र धमकीला भीक न घातल्याने सोशल मिडीयावर पिडितेची कॉलगर्ल म्हणून बदनामी करण्याचा प्रयत्न केला. शेवटी पिडीत तरुणीने आंबोली पोलिसांत तक्रार केली होती. तीन दिवसांपूर्वीच पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत आरोपीची पोलीस कोठडी चौकशी सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT