मुंबई

अनिल देशमुख आज ईडी कार्यालयात येणार नाहीत; वकिलाची माहिती

अनिल देशमुखांच्या ऐवजी वकिलाची ईडी कार्यालयात हजेरी अनिल देशमुख आज ईडी कार्यालयात येणार नसल्याची वकिलांची माहिती Anil Deshmukh 100 crores Extortion Case Parambir Letterbomb Advocate demands Revised date for inquiry by ED

विराज भागवत

देशमुखांऐवजी वकिलाची ईडी कार्यालयात हजेरी

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना खंडणी वसुली (Extortion) प्रकरणाच्या चौकशीसाठी ईडीने (ED) समन्स (Summons) बजावले होते. शनिवारी सकाळी ११ वाजता चौकशीसाठी (Inquiry) हजर राहण्याचे आदेश ईडीकडून देण्यात आले होते. पण सकाळी ११ च्या सुमारास अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर न राहता त्याजागी त्यांच्या वकिलांनी कार्यालयात हजेरी लावली. अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात हजर राहणार नाहीत. त्यांना नीट रितसर (Essential Documents) माहिती दिली जावी आणि पुढील वेगळी तारीख (Revised Date) दिली जावी, अशी मागणी करणारे पत्र (Letter) ईडीला देण्यात आल्याचे वकिलांनी सांगितले. (Anil Deshmukh 100 crores Extortion Case Parambir Letterbomb Advocate demands Revised date for inquiry by ED)

परमबीर सिंह यांच्या लेटरमॉबॉम्बमुळे अनिल देशमुखांना ईडीचा सामना करावा लागतो आहे. त्याच प्रकरणात ईडीने चौकशीसाठी अनिल देशमुखांना बोलावले होते. सकाळी ११ वाजताच्या सुमारास ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश अनिल देशमुखांना देण्यात आले होते. मात्र अनिल देशमुखांच्या ऐवजी त्यांचे वकिल कार्यालयात हजर झाले. आम्ही ईडीकडे पत्र देऊन चौकशीला हजर राहण्याबाबत पुढील तारखेची वेळ मागितली आहे, असं ते म्हणाले.

पत्रात काय म्हटलंय...

अनिल देशमुख यांच्या वकिलांनी दिलेल्या पत्रात लिहिलंय की, माझा (देशमुखांचा) जबाब काल ईडीने नोंदवून घेतला. माझे वय ७२ वर्षे असून मी अनेक सहव्याधींनी (Co-Morbid) ग्रस्त आहेत. काल माझी जी चौकशी झाली त्यामुळे मला खूप थकवा जाणवतो आहे. तसेच, ज्या केसबद्दल माझी चौकशी करण्याचा विचार आहे त्याच्याशी माझा संबंध नसून माझ्यावर लावण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत.

"आम्ही ईडीच्या कार्यालयात गेलो होतो. ईडीने ज्या संदर्भात समन्स बजावला आहे, त्याची कोणतीही कागदपत्रे ईडीकडून आम्हाला देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे कोणत्या गुन्ह्यांच्या संदर्भात चौकशी केली जाणार आहे ते स्पष्ट करण्यात आलेले नाही. आम्हाला याची नीट रितसर कल्पना नाही. केंद्रीय तपास यंत्रणेकडून जाणीवपूर्वक दबाव टाकला जात आहे. आम्ही त्यांच्याकडून ईडीकडून अधिकची माहिती आणि चौकशीसाठी पुढील तारीख मागितली आहे", अशी माहिती अँड जयवंत पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT