Anil-Deshmukh 
मुंबई

"भ्रष्टाचार करताना कुठलीही लाज..."; भाजपचा घणाघात

"बदल्या, वाझे, मंत्र्याना गाड्या या प्राथमिकता बदलल्या असत्या तर..."

विराज भागवत

महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांमध्ये राजकीय वातावरण प्रचंड तणावाचे असल्याचं दिसून आलं. सर्वप्रथम शिवसेनेच्या संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. ते प्रकरण निवळत असतानाच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी तत्कालीने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दरमहा १०० कोटी रूपयांच्या वसूलीसाठी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप केला. या आरोपावरून मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुखांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले आणि देशमुखांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. याच प्रकरणात अनिल देशमुख यांची अनेकदा चौकशी झाल्यानंतर अखेर शनिवारी त्यांच्याविरोधात सीबीआयने गु्न्हा नोंदवला आणि त्यांच्या निवासस्थानांवर तसेच मालमत्तांवर छापेमारी केली. ही घटना समजल्यानंतर भाजपच्या नेतेमंडळींनी पुन्हा एकदा संधी न दवडता अनिल देशमुखांवर टीका केली.

"अनिल देशमुख हे शेवटपर्यंत खुर्चीला चिकटून बसले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांनी खुर्ची सोडली आणि त्यांच्यावर सीबीआय चौकशी लागली. आता सीबीआयने 'वसूल'मंत्री अनिल देशमुखांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. महाराष्ट्राला जेव्हा कोरोनाच्या संकटात मदतीची गरज होती, तेव्हा हे वसूली मंत्री एकट्याने वसूली करत होते की त्यांचे वाटेकरी होते? हे समजेल. महाराष्ट्राच्या जनतेला या वसूलीचे वाटेकरी माहिती आहेत. त्यामुळेच सीबीआयच्या चौकशीमध्ये जसे आज अनिल देशमुख आहेत तसेच उद्या महाविकास आघाडीतील वाटेकरीही दिसतील. भ्रष्टाचार करताना कुठलीही लाज न बाळगणाऱ्या अनिल देशमुख यांना जेलमध्ये जावंच लागेल", अशी घणाघाती टीका भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी केली.

बदल्या, वाझे अन् मंत्र्याना गाड्या...

भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या मुद्द्यावरून ठाकरे सरकारला टीकेचं लक्ष्य केलं. 'महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगत होते की आपल्याकडे कोरोनाची लाट येऊ शकते. त्यांना तसा अंदाज होता तर मग बेड, ऑक्सिजन, रेमडेसीव्हर यांचा विचार का केला नाही? बदल्या, वाझे, कंत्राटदारांची बिल, बिल्डरांना सवलती, मंत्र्याना गाड्या या प्राथमिकता बदलल्या असत्या तर आज महाराष्ट्रातील जनता बेहाल नसती', अशी टीका त्यांनी ठाकरे सरकारच्या कार्यपद्धतीवर टीकास्त्र सोडलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Mumbai News: नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

Latest Maharashtra News Live Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT