anil deshmukh sakal media
मुंबई

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना हायकोर्टाकडून दिलासा नाहीच

सुनिता महामुनकर

मुंबई : भ्रष्टाचाराचे आरोपामुळे (Corruption allegations) अडचणीत सापडलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांना आजही मुंबई उच्च न्यायालयाकडून (mumbai high court) दिलासा मिळाला नाही. देशमुख यांच्या याचिकेवर (petition) आता ता 29 रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, ईडिने (enforcement directorate) याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. याप्रकरणी ईडिने देशमुख यांना आतापर्यंत पाच समन्स बजावले असून चौकशीला हजर राहण्यास सांगितले आहे. मात्र देशमुख यांनी ईडिसमोर हजेरी लावली नाही. तसेच या समन्स विरोधात उच्च न्यायालयात याचिका केली आहे. यावर गुरुवारी न्या एस एस शिंदे आणि न्या एन जे जमादार यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

ईडिच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता नवी दिल्लीतून बाजू मांडणार आहेत. त्यामुळे ही सुनावणी ऑनलाईनवर घ्यावी अशी मागणी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी केली. या मागणीला देशमुख यांच्या वतीने एड अनिकेत निकम यांनी आणि एड विक्रम चौधरी यांनी विरोध केला. ईडी याचिकेची सुनावणी होऊ नये म्हणून विलंब करीत आहे, यापूर्वी देखील ईडिने असाच विलंब केला. केवळ दबाव निर्माण करुन ईडी नाहक विलंब करीत आहे, त्यामुळे न्यायालयाने आज सुनावणी घ्यावी आणि देशमुख यांना दिलासा द्यावा अशी मागणी चौधरी यांनी केली.

खंडपीठाने दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकून घेतली आणि ता 29 रोजी याचिकेत उपस्थित सर्व मुद्यांवर सुनावणी घेण्याचे निर्देश दिले. सुनावणी घेतल्याशिवाय दिलासा देण्यास खंडपीठाने नकार दिला. ईडिला हवे असल्यास ते यावर लेखी भूमिका दाखल करु शकतात, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. देशमुख यांचे सहकारी संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे सध्या अटकेत आहेत. निलंबित पोलीस सचीन वाझेमार्फत हॉटेल चालकांकडून सुमारे 4.70 कोटी रुपयांची खंडणी वसूल करुन ती देशमुख यांच्या श्री साई शिक्षण संस्थेत वळविण्यात आली असा आरोप ईडिने मनीलॉण्ड्रिंग अंतर्गत केला आहे.

पदाचा गैरवापर करून देशमुख यांनी निकटवर्तीय नावे रक्कम जमा केली, असे ईडिने म्हटले आहे. तर हा संपूर्ण प्रकार राजकीय कारस्थान आहे असे देशमुख यांनी आरोप केला आहे. दरम्यान, देशमुख यांच्या विरोधात ईडिने केलेल्या याचिकेवर महानगर दंडाधिकारी न्यायालयात ता 28 रोजी युक्तिवाद होणार आहेत. देशमुख समन्स बजावूनही चौकशीला हजर राहत नाही, असा आरोप ईडिने केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Kale Murder Case: काळे हत्येचा धागा आंदेकर टोळीपर्यंत? आरोपींची नावे अन् ‘कनेक्शन’ समोर... मोठी अपडेट

'विवेक मेरी माँ मर रही है' नॉन व्हेज खात शाहरुख मित्राला म्हणाला...'क्या तुम जानते हो विवेक?'

Pandharpur Kartiki Ekadashi: एकनाथ शिंदेंच्या हस्ते सपत्नीक पांडुरंगाची महापूजा; नांदेडचे वालेगावकर दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी

Pune Lawyers Protest : वकील उद्या लाल फीत लावून कामकाज करणार, वकील संरक्षण कायद्याची मागणी

भारताकडून अंडर १९ वर्ल्ड कप खेळलेल्या क्रिकेटपटूचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT